रविकांत तुपकारांच्या वाहनाचा अपघात; दोन बाईक्सवार जखमी...
रविकांत तुपकारांच्या वाहनाचा अपघात; दोन बाईक्सवार जखमी...संजय जाधव

रविकांत तुपकारांच्या वाहनाचा अपघात; दोन बाईक्सवार जखमी...

ही घटना काल ( २२ नोव्हेंबर ) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

बुलढाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे मुंबईला जातअसताना बेराळा फाटा (ता. चिखली) येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. ही घटना काल ( २२ नोव्हेंबर ) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. येवता येथून बेराळा येथे जाताना रस्ता ओलांडणारे दोन दुचाकीस्वार तुपकरांच्या गाडीला धडकले. यात दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले. गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमी तरुणांची नावे आहेत.

हे देखील पहा -

अपघात घडताच तुपकरांनी दोघांनाही आपल्या वाहनात घेऊन चिखली येथील डॉ. महिंद्रे रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही तरुणांना औरंगाबाद येथे नेण्यात आले. स्वतः रविकांत तुपकर जखमी तरुणांना औरंगाबादला घेऊन गेले.

२४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईला बैठक होत आहे. या बैठकीसाठी रविकांत तुपकर हे सौरभ सावजी यांच्या मालकीच्या असलेल्या इनोव्हा कारने मुंबईसाठी निघाले होते. चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण भरधाव बेराळ्याकडे जात होते. रस्ता ओलांडत असताना दुचाकी तुपकरांच्या वाहनावर आदळली.

रविकांत तुपकारांच्या वाहनाचा अपघात; दोन बाईक्सवार जखमी...
शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दुचाकी चालवणार तरुण हा नवीनच दुचाकी चालविणे शिकला असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यात तुपकरांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर लगेच तुपकरांनी दोन्ही तरुणांना चिखली येथील रुग्णालयात दाखल केले. तुपकरांनी स्वतः त्यांचे वाहन चिखली पोलीस ठाण्यात जमा केले. त्यानंतर दोन्ही तरुणांना रुग्णवाहिकेत घेऊन तुपकर औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com