कर्जत-जामखेड मतदारसंघ प्रमुखपदी रवींद्र सुरवसे

कर्जत-जामखेड मतदारसंघ प्रमुखपदी रवींद्र सुरवसे
रवींद्र सुरवसे

अहमदनगर : माजी मंत्री राम शिंदे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरवात केली आहे. कायम सोबत असलेल्या रवींद्र सुरवसे यांची कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी निवड झाली केली आहे. सुरवसे यांच्या निवडीने निष्ठावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना काळानंतर माजी मंत्री शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विविध ठिकाणी सभासमारंभ होत आहेत. विरोधकांवर ते आपल्या स्टाईलने टीकाटिप्पणी करीत आहेत. परिणामी कार्यकर्तेही चार्ज झालेत.Ravindra Survase as the head of Karjat-Jamkhed constituency

शिंदे हे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढले. त्यावेळी निवडक कार्यकर्ते शिंदे यांच्यासमवेत होते. त्यापैकी रवींद्र सुरवसे यांचा समावेश होता. सुरवसे यांना निष्ठेचे फळ म्हणून माजी मंत्री राम शिंदे यांनी पक्ष संघटनेमध्ये विविध जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. सुरवसे यांनी ही त्या जबाबदारी नेटाने सांभाळल्या. यामध्ये सुरवसे हे तालुका सरचिटणीस झाले.त्यानंतर सलग सात वर्ष भाजपच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली होती.

रवींद्र सुरवसे
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

सुरवसे तालुकाध्यक्ष असतानाच माजी मंत्री शिंदे यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. कठीण वेळेतही सुरवसे शिंदे यांच्यामागे उभे राहिले. ही जाणीव ठेवत शिंदे यांनीही त्यांना वेळोवेळी संधी दिली. सुरवसे यांच्या सौभाग्यवती मनीषा यांना पंचायत समिती निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली. त्या निवडूनही आल्या. त्यांना उपसभापतीपदाची संधी मिळाली. दरम्यान काही काळ प्रभारी सभापतीपदही त्यांनी सांभाळले.Ravindra Survase as the head of Karjat-Jamkhed constituency

सुरवसे हे शिंदेंबरोबरच पक्षाशीदेखील एकनिष्ठ आहेत. त्यामुळेच त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावला. मागील वर्षांपूर्वी सुरवसे यांना भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, तर यावेळी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com