नांदेड जिल्ह्यातील क्राईम फोकस वाचा एका क्लिकवर

हर्षद शेख अमिनोद्दिन यांचे मेहुणे हे त्यांचा सायकल रिक्षा घेऊन मराठवाडा मशनरी या दुकानाच्या समोर ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी जात होता.
नांदेड जिल्ह्यातील क्राईम फोकस वाचा एका क्लिकवर
नांदेड क्राईम जगतच्या बातम्या

नांदेड : वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिजामाता हॉस्पिटल परिसरात शेख हर्षद शेख हम्मीमोदींन यांच्या नातेवाईकावर दोन अनोळखी तरुणांनी चाकुने व धारदार शस्त्राने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सहा जुलैच्या रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की हर्षद शेख अमिनोद्दिन यांचे मेहुणे हे त्यांचा सायकल रिक्षा घेऊन मराठवाडा मशनरी या दुकानाच्या समोर ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी जात होता. या वेळी याच परिसरातील दोन तरुणांनी संगणमत करुन जुन्या कुठल्यातरी कारणावरुन त्यांना मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या पोटात चाकूने मारुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून हर्षद शेख राहणार खडकपुरा यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात दोन अनोळखी तरुणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जमदाडे करत आहेत.

हेही वाचा - बाबुराव कदम यांनी बंडखोरी केली तरी ते जनाधार असणारे शिवसैनिक होते. हे निकालाने सिद्ध केले होते. याच कारणामुळे कोहळीकर यांनी पक्षातील वरिष्ठांशी स्नेहसंबंध कायम ठेवले असावेत

मामीच्या गळ्यातील भाच्याने चोरले मंगळसुत्र

नांदेड : तामसा ते नांदेड रस्त्यावर असलेल्या एका बारच्या पुढे एका महिलेच्या गळ्यातील 19 हजार रुपये सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी जबरीने तोडून नेले. विशेष म्हणजे हा चोरटा पकडल्यानंतर सदर महिलेचा भाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुवर्णमाला मनोज जाधव राहणार तळेगाव तालुका हदगाव यांच्या फिर्यादीवरुन तामसा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून चोरलेले मंगळसुत्र जप्त केले.

इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी

नांदेड : चौफाळा परिसरातील जिल्हा परिषद हायस्कूल जवळ शृती कॉमन सर्विस ऑनलाइन दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एलसीडी मॉनिटर आणि नगदी दोन हजार असा साडेसहा हजाराचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व दुकानाचे कुलूपसुध्दा पळविले. दुकान मालक मुंजाजी लहाने यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला

नांदेड : शहराच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवरामनगर भागात राहणारा शुभम परतवाडा यांच्या घरासमोर लावलेली एक दुचाकी (किमत 50 हजार) रुपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तसेच शाहूनगर येथील विकास ढोक यांनी आपल्या मामाच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविली या दोन्ही दुचाकी चोरीच्या घटना विमानतळ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

येथे क्लिक करा - ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चुराडा ४ मृत्यू

मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर मारहाण

नांदेड : खैरगाव तालुका अर्धापूर येथील जालिंदर अशोक ढोणे यांच्या फिर्यादीवरुन मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर ढोणे हे बुधवारी (ता. सात) जेवन करुन रात्री आठच्या सुमारास अंगणात बसले होते. यावेळी गावातील काही तरुणांनी येऊन त्यांच्याशी वाद घातला. य३नंतर मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती समजल्यानंतर मनाठा पोलिसांनी खैरगाव गाठून पंचनामा केला.

कंधारमध्ये जबर मारहाण

नांदेड : शिवाजी हायस्कूल पानभोसी रस्त्यावर सय्यद इस्माईल सय्यद शहाबुद्दीन यांना लोखंडी रॉडने व काठीने जुन्या भांडणाच्या कारणावरुन जबर मारहाण करण्यात आली. तसेच फळाचा गाडा रस्त्यावर लावू देत नाही असे म्हणून जबर मारहाण केली. यात सय्यद इस्माईल यांच्या हाताला जबर दुखापत झाली असून डोळ्याच्या भूवईलाही गंभीर मार लागला आहे. याप्रकरणी सय्यद इस्माईल यांच्या फिर्यादीवरुन कंधार पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com