Nashik Recruiting: नाशिक महापालिकेत विविध पदांसाठी भरती; २४ वर्षांपासून रखडलेल्या नोकरभरतीला अखेर मुहूर्त

नाशिक महापालिकेत पुढील १५ दिवसांतच दोन विभागात भरती होत आहे.
Nashik Recruiting: नाशिक महापालिकेत विविध पदांसाठी भरती; २४ वर्षांपासून रखडलेल्या नोकरभरतीला अखेर मुहूर्त
अभिजीत सोनवणे, नाशिक

Nashik News : गेल्या २४ वर्षांपासून रखडलेल्या नाशिक महापालिकेच्या भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. नाशिक महापालिकेत पुढील १५ दिवसांतच दोन विभागात भरती होत आहे. त्यामुळे नाशिकच्या अनेक होतकरू तरूणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पालिकेत ५०० हून अधिक पदांसाठी ही भरती होत आहे.

Nashik Recruiting: नाशिक महापालिकेत विविध पदांसाठी भरती; २४ वर्षांपासून रखडलेल्या नोकरभरतीला अखेर मुहूर्त
Nashik: नाशकात मध्यरात्री बिबट्याचा थरार!; तब्बल दोन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पालिकेत अग्निशामक आणि वैद्यकीय अशा दोन विभागात विविध रिक्त पदे आहेत. गेल्या २४ वर्षांपासून ही रिक्त पदे भरलेली नाहीत. यात अग्निशामक विभागाची ३४८ तर आरोग्य आणि वैद्यकीय सेवा विभागातील ३५८ पदांसाठी भरती होणार होत आहे. तसेच यात आणखीन एक दिलासा म्हणजे सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाल्यावर उर्वरित २ हजार पदांची भरती (Recruitment) प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Nashik Recruiting: नाशिक महापालिकेत विविध पदांसाठी भरती; २४ वर्षांपासून रखडलेल्या नोकरभरतीला अखेर मुहूर्त
Nashik News: तृतीय वर्षाच्‍या विद्यार्थ्याची हॉस्‍टेलमध्‍ये आत्महत्या

नाशिक (Nashik) महापालिकेत सध्या एकूण ७०६ रिक्त पदे भरण्यात येत आहेत. पुढील १५ दिवसांमध्येच ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश नाशिक पालिका आयुक्तांनी दिले आहेत. कोरोना महामारीमुळे भरती लांबणीवर पडली होती. तसेच या काळात अनेक तरूणांच्या नोकऱ्याही गेल्या. त्यामुळे तरूणांसाठी ही मोठी संधी असल्याचे म्हटले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com