राज्य अध्यापक विकास संस्थेतील पदासांठी मंगळवारपर्यंत करा अर्ज

RUSA च्या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.
राज्य अध्यापक विकास संस्थेतील पदासांठी मंगळवारपर्यंत करा अर्ज
RUSA

सातारा : राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या सर्वसमावेशक प्रशिक्षणासाठी पुणे येथे महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेची (महाराष्ट्रा स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी) स्थापना केली आहे. या अकादमीत सहसंचालक तसेच अकादमीअंतर्गत विविध केंद्रांसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक यांनी केले आहे.

RUSA
प्रवाशांसाठी खूषखबर; सातारा- स्वारगेट शिवशाही बस सेवा सुरु

या अकादमीच्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र (सेंटर फॉर मल्टी डिसीप्लिनरी करिक्युलम ॲण्ड पेडागॉजी) , नेतृत्व विकसन केंद्र (सेंटर फॉर लीडरशिप डेव्हलपमेंट), समावेश आणि विविधता केंद्र (सेंटर फॉर इन्क्लुजन ॲण्ड डायव्हरसिटी), नाविन्यता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र (सेंटर फॉर इन्होवेशन ॲण्ड कटींग एज टेक्नॉलॉजी), संसाधन केंद्र (सेंटर फॉर रिसोर्सेस) आणि  सेंटर फॉर नेटवर्कींग या सहा केंद्रांसाठी केंद्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

एमएसएफडीए बद्दलची माहिती, पदांचे तपशील, नियुक्तीसाठीची पात्रता, निकष आदींची Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan (RUSA) यांच्या संकेतस्थळावर तपशीलवार जाहिरातीत उपलब्ध आहे अशी माहिती राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे राज्य प्रकल्प संचालक तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक यांनी दिली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com