भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका करा : चंद्रशेखर आझाद

नंदुरबारमध्ये भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आजाद यांची संविधान जनजागृती सभा
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका करा : चंद्रशेखर आझाद
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका करा : चंद्रशेखर आझाददिनू गावित

नंदुरबार : देशातील ८५ टक्के बहूजन समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद आहे. मात्र, बहूजन समाज संघटीत नाही, तो जेव्हा त्याच्यातील ताकद ओळखेल त्यावेळी तो मालक बनू शकेल, असे प्रतिपादन भीम आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय नेते ऍड. चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी केले. भिम आर्मी एकता मिशन अंतर्गत दि.१९ नोव्हेंबरपासून भीमा कोरेगाव येथून सुरु होणारी संविधान जनजागृती यात्रा आज नंदुरबारात आली. त्यानिमित्त आयोजित सभेत आझाद बोलत होते. यावेळी व्यासपीठावरुन त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

हे देखील पहा :

जो शासक आपल्या देशातील प्रजेचे ऐकत नाही तो तानाशाहच असतो असे सांगत चंद्रशेखर आझाद यांनी मोदींना तानाशाहची उपमा दिली. मागच्या वर्षभरात शेतकरी आंदोलनादरम्यान साडे सातशेहुन अधिक शेतकऱ्यांनी प्राण सोडले. मात्र, मोदी चुप्पी साधुन होते. त्यामुळे मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज चंद्रशेखर आझादांनी केली आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तीन काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका करा : चंद्रशेखर आझाद
माजी आमदाराचा महावितरणच्या कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न! पहा Video

मात्र, तरी देखील मोदी कधी पलटतील याचा काहीही भरोसा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कंगणा (Kangana Ranaut) सारख्या फालतु लोकांवर मी काय बोलणार? त्यांना पद्मश्री भाजप सरकारच्या हिशेबाने दिला जातो. पुरस्कार द्यायचा असेल तर महात्मा फुले, राजश्री शाहु महाराज यांना भारतरत्न द्या अशी मागणी यावेळी त्यांनी केली. राज्यात झालेल्या भिमा कोरगाव (Bhima Koregaon) दंगली प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व बहुजन बांधवांची सुटका करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तर महात्मा ज्योतीबा फुलेंचा स्मृतीदिन शासनाने शिक्षण दिन म्हणुन घोषीत करण्याची मागणी करत संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com