पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा तालुका झाला भावूक

परमेश्वर कदम यांची ओळख ही दबंग, कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संवेदनशील पोलिस निरीक्षक अशी आहे.
पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा तालुका झाला भावूक
पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा तालुका झाला भावूकदिपक क्षीरसागर

लातूर : एखाद्या पोलिस अधिकाऱ्यांच्या police officers बदलीनंतर त्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांनी आणि इतर कार्यरत अधिकाऱ्यांनी मिळून अशाप्रकारे एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम लातूरLatur जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. Replacement of police officer

हे देखील पहा-

मागील दोन वर्षापासून परमेश्वर कदमParemeshvar kadam यांनी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यभार पाहीला त्यांनी सर्वसामान्यांशी संपर्क वाढवत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांची ओळख ही दबंग, कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संवेदनशील पोलिस निरीक्षक अशी आहे. परमेश्वर कदम यांची सध्या तालुका जळकोट येथे प्रशासकिय कारणावरुन बदली झाली आहे ते शिरूर अनंतपाळ पोलिस स्टेशन सोडून जात असल्यामुळे त्यांची तालुक्यातील नागरिक, पोलीस पाटील तसेच जेष्ट नागरिक आणि पञकार व पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यानी त्यांना वाजतगाजत निरोप दिला. त्याना निरोप देतेवेळी उपस्थित सर्वजण भावनाविवश झाले होते.

पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा तालुका झाला भावूक
बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

कोरोनाकाळामध्ये पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी तरुणांच्या मदतीने कोरोना फोर्सची पथके तयार केली होती. लसीकरणासाठीVaccination नागरिकामध्ये जनजागृतीही केली होती. अनेक कुटुंबीयांना त्यांनी स्वखर्चातून संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू देऊन माणुसकीचे दर्शनही घडविले होते.

‘पोलिस जनतेचा खरा मित्र’ असतो ही संकल्पना राबविल्याने स्थानिक नागरिकांबरोबरच ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमध्येही लोकप्रिय ठरले होते. दरम्यान कदम यांच्या निरोपसंमारंभावेळीच शिरूर अनंतपाळ येथे नव्याने रुजु झालेले पोलीस निरिक्षक सुडके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कदम यांनी निरोप देताना उपस्थित सर्व नागरिकांना भावना अनावर झाल्या. यावेळी येरोळचे माजी सरपंच अतुल पाटील गंभीरे , पञकार ओमप्रकाश तांबोळकर , महादेव आवाळे , संदिप धुमाळे, जर्नाधन पाटील सुमठाणकर, सुधीर लखनगावे व अन्य नागरिक उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com