विठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीच्या तरटीच्या वृक्षाची पुनर लागवड

येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंदिरातील संत कान्होपात्रा समाधी जवळील जून्या पिंपळ्याच्या झाडाच्या जागी तरटी वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे.
विठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीच्या तरटीच्या वृक्षाची पुनर लागवड
विठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीच्या तरटीच्या वृक्षाची पुनर लागवडभारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर -  विठ्ठल रुक्मिणी मंदिरात Temple संत कान्होपात्रेची संजीवन समाधी आहे. समाधी लगतच येथे शंभर वर्षापूर्वीचे जुने तरटीचे झाड आहे. विठ्ठल Vitthal दर्शनापूर्वी दर्शन रांगेतील भाविक याच झाडाच्या Tree फांदीला मिठी मारुन कान्होपात्रेचे दर्शन झाल्याचे समाधान मानतात. Replanting of hundred year old Tarti tree in Vitthal temple

दरम्यान मंदिरातील हे शंभर हून अधिक वर्षापूर्वीचे  जूने  कान्होपात्रेच झाड वटून गेले आहे. येथे फक्त झाडाच्या वाळलेल्या फांद्या उरल्या आहेत. तरीही भाविक कान्होपात्रेचं झाड म्हणून याच वाळलेल्या फांद्यावर माथा टेकवून कान्होपात्रेचे मनोभावे दर्शन घेतात. मंदिर समितीने येथे नवीन तरटीचे झाड लावण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा -

मंदिरातील तरटीच झाड आणि संत कान्होपात्रा यांच्या विषयी भाविकांच्या मनात अपार श्रध्दा आहे. भाविकांच्या भावनेचा आणि श्रध्देचा विचार करुन विठ्ठल मंदिर समितीने संत कान्होपात्रेच्या समाधी जवळ पु्न्हा नव्याने तरटीचे झाड लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंदिरातील संत कान्होपात्रा समाधी जवळील जून्या पिंपळ्याच्या झाडाच्या जागी  तरटी वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे.

या  निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता कान्होपात्रेच्या बहरलेल्या नव्या वृक्षाचे दर्शन मिळणार आहे. मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथील गणीकेची मुलगी कान्होपात्रा ही विठ्ठलाची निस्सीम भक्त होती.

विठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीच्या तरटीच्या वृक्षाची पुनर लागवड
मोदी सरकारने केली नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती

बिदरच्या बादशहा पासून आपले रक्षण व्हावे म्हणून तीने थेट विठ्ठलाला साकडे घातले. विठ्ठलाने तिची ही कैफियत ऐकून तीला मंदिरातील बाजीराव पडसाळीत समाधी घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार संत कान्होपात्रेनं येथे संजीवन समाधी घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हा पासून  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात याच तरटी झाडाच्या रुपात कान्होपात्रेला  पाहिले जाते. कालांतराने हे झाड वाळून गेले.

या झाडाचे दर्श घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही,अशी वारकऱ्यांची धारणा आहे. भाविकांच्या श्रध्देचा व त्यांच्या विषयी असलेल्या भावनांचा विचार करुन  विठ्ठल मंदिर समितीने येथे पुन्हा  तरटी वृक्षाराचे रोपण करण्याचा निर्णय घेतल्याचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com