मुंडे भगिनींसाठी राजीनाम्याचे लोण बीडपाठोपाठ नगरमध्ये

संग्रहित
संग्रहित

राजू घुगरे, अमरापूर (ता.शेवगाव) : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजपने खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने नाराज झालेल्या मुंडे समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्राचे लोण बीड व पाथर्डीपाठोपाठ शेवगाव तालुक्यातही पोहचले आहे. मुंडे यांच्यावरील अन्यायाची पक्षाकडून दखल घेतली जावी, यासाठी शेवगावातील तालुक्यातील अनेक पदाधिका-यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे सादर केले आहेत.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी परळी व बीडपाठोपाठ पाथर्डीला नेहमीच झुकते माप दिले. त्यामुळे पाथर्डी तालुक्यात व भाजपमध्ये मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही मंत्रीपद व इतर माध्यमातून सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवल्याने त्यांचे व पर्यायाने भाजपचे प्राबल्य दोन्ही तालुक्यात व मतदारसंघात आहे. त्याचा प्रत्यय दोन विधानसभा निवडणुकीत आला.

संग्रहित
पंकजा मुंडे , विनोद तावडे मोदींच्या भेटीला

या हक्काच्या हुकमी मतांच्या बेरजेवर आमदार मोनिका राजळे दोन वेळा भाजपच्या लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेवर गेल्या. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळीत धक्कादायक पराभव झाल्यानंतर व राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर मुंडे भगिनी काहीअंशी राजकीय विजनवासात आहेत.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बहुप्रतिक्षित विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा मतदारसंघातील समर्थकांना होती. मात्र, त्यांना डावलून इतर कनिष्ठ खासदारांना मंत्रिपद मिळाल्याने मुंडेसमर्थक भाजप पदाधिका-यांनी राज्यभर राजीनामासत्र सुरू केलंय.

यांनी दिले राजीनामे

शेवगाव तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ही आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. त्यामध्ये किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कचरू चोथे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ढाकणे, नगरसेवक व जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलेश गांधी, जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस गणेश कराड, तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस अभिजित घोळवे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ माळवदे, बाळासाहेब डोंगरे आदी समर्थकांचा समावेश आहे. अनेक जण राजीनाम्याच्या तयारीत आहेत. आता पक्षाच्या पुढील भूमिकेकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com