संत निळोबारायांच्या पादुकांना चंद्रभागेत स्नान

संत निळोबारायांच्या पादुकांना चंद्रभागेत स्नान
संत निळोबारायांच्या वंशजांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेत नैवेद्य दाखवला.

अहमदनगर : संत परंपरेत पारनेर तालुक्यातील संत निळोबारायांना मोठे स्थान आहे. ते संत तुकारामांचे शिष्य म्हणून वारकरी संप्रदायात परिचित आहेत. पालखी सोहळ्यातही त्यांच्या पालखीला मान आहे. नगर जिल्ह्यातील ही एकमेव मानाची पालखी आहे.

आषाढी एकादशीला दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी अहमदनगर जिल्ह्यातील संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्यातील चलपादुकांचे चंद्रभागेत निळोबारायांचे वंशज व सोहळा प्रमुख गोपाळ काका मकाशीर व नंदा मकाशीर यांनी भाविकांच्या उपस्थितीत स्नान घातले.

यावेळी दिनकर महाराज पिंगळे यांनी चंद्रभागेत निळोबारायांच्या पादुकांना मंत्रउच्चार करत विधीवत असे स्नान घातले. Respect the palakhi ceremony of Saint Nilobaraya in Pandharpur abn79

संत निळोबारायांच्या वंशजांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेत नैवेद्य दाखवला.
राज कुंद्रा आणि कंपनीचे हे होते उद्योग; पोलिसांनी दिली माहिती

यावेळी विणेकरी पांडुरंगबुवा रासकर, हभप समाधान महाराज शर्मा, सरपंच सुभाष गाजरे, सुरेश पठारे, बाळासाहेब सावंत, विजय गुगळे, देवेंद्र लतांबळे, पांडुरंग खामकर, नीलेश लटांबळे, माऊली खामकर, बाळासाहेब गाडे आदी वारकरी उपस्थित होते.

दरम्यान संत निळोबारायांच्या धर्मशाळेत पहाटे काकडा आरती पार पडली. त्यानंतर पालखी चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी धर्मशाळेतून बाहेर पडली. यावेळी वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात हरिनामाचा गजर व अभंग म्हणत चंद्रभागेच्या स्नानानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला नगरप्रदक्षिणा घालण्यात आली. या वेळी संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर पंढरीतील ग्रामस्थांनी रस्त्यावर आकर्षक अशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तर काही ठिकाणी पालखीवर फुलांचा वर्षाव करतानाचे चित्र पहायला मिळाले.

विठ्ठल-रुक्मिणी व संत निळोबारायांची आज सकाळी १० वाजता पंढरपूर येथे पांडुरंगाच्या चरणी संत निळोबारायांच्या पादुका ठेवून देवाला नैवेद्याचा घास भरवून मोजक्या वारकऱ्यांसह भेट झाली. 'भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद' हाच भाव यावेळी सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळत होता. यावेळी निळोबारायांचे वंशज गोपाळकाका मकाशीर व नंदा मकाशीर यांनी सपत्नीक विठ्ठल-रखुमाईला नैवेद्य दाखविला.

पालखी सोहळ्याने पांडुरंगाच्या मंदिरात पश्चिम दरवाज्याने आत जात महाद्वारातून मंदिरात प्रवेश करत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर काहीवेळ मंदिरात विसावा घेतल्यानंतर नामदेव पायरीजवळ भजन म्हणत नगरप्रदक्षिणा घातली.

निळोबारायांची पालखी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पोहचल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, मंदिरे समितीचे विश्वस्त जळगावकर, अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचेकडून निळोबारायांचे वंशज गोपाळकाका मकाशीर व नंदा मकाशीर यांचा सपत्निक, विणेकरी पांडुरंग रासकर, कार्याध्यक्ष अशोक सावंत, हभप समाधान महाराज शर्मा, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला.

पांडुरंगाच्या व रुक्मिणी मातेच्या पायावर डोकं टेकवून दर्शन मिळाल्यानंतर "पावलो पंढरी वैकुंठ भुवन" अशा शब्दांत जीवनाचं सार्थक झालं. यापेक्षा अधिक मला काही नको आहे. मात्र, हे कोरोनाचे संकट लवकर संपू दे. सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाची व रुक्मिणी मातेची भेट होऊ दे.Respect the palakhi ceremony of Saint Nilobaraya in Pandharpur abn79

- हभप दादाकाका पिंगळे महाराज, वारकरी संत निळोबाराय पालखी सोहळा.

पांडुरंगाचे व रुक्मिणी मातेच दर्शन असं मर्यादित वारकऱ्यांमध्ये नको आहे, तर सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस मागील दोन वर्षांपासून लागली आहे. हे कोरोनाचे संकट लवकर संपून सर्व वारकऱ्यांना दर्शन व्हायला पाहिजे, हीच विठ्ठल चरणी पार्थना.

- किसनराव नाणेकर, वारकरी, संत निळोबाराय पालखी सोहळा.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com