IPL मॅचवर सट्टेबाजी करणाऱ्या रेस्टॉरंट मालकाला अटक
IPL MatchSaam TV

IPL मॅचवर सट्टेबाजी करणाऱ्या रेस्टॉरंट मालकाला अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून दोन मोबाईल हँडसेट, आयपीएलचे आकडे लिहिलेली पट्टी जप्त करण्यात आली आहे.

भंडारा : भंडाऱ्यात (Bhandara) एका रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या आयपीएलच्या (IPL) सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या छाप्यामध्ये रेस्टॉरंट मालकाला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील करडी येथे घडली असून अविनाश केशव बावनकर वय वर्ष ३३ रा. सुभाष वॉर्ड, करडी असे अटक करण्यात आलेल्या रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे.

अविनाश याचे करडीत रेस्टॉरंट असून येथून अविनाश हा तुमसर येथील शेखर उर्फ सोनू अग्रवाल याच्या सांगण्यावरून आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर (IPL Cricket Match) पैशाची हारजीतची बाजी लावून नागरिकांकडून पैसे घेऊन आकडे उतरवित होता.या गुप्त माहितीवरून भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून छापा घातला.

IPL Match
एकच क्लिप एकच भाषण, राज ठाकरेंवर दबाव असावा - जयंत पाटील

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अविनाश बावनकर याच्या ताब्यातून दोन मोबाईल हँडसेट, आयपीएलचे आकडे लिहिलेली पट्टी व साहित्य, रोख २ हजार ३५० रुपये, असा मुद्देमाल ताब्यात घेतला असून अविनाशविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दूसरा आरोपी शेखर उर्फ सोनू अग्रवाल याचा शोध गुन्हे शाखेचे पथक घेत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.