बाप्पाच्या विसर्जनासाठी कराडच्या तहसीलदारांचा नवा आदेश

बाप्पाच्या विसर्जनासाठी कराडच्या तहसीलदारांचा नवा आदेश
ganesh idol immersion

कराड : काेयना पाणलाेट क्षेत्रात सततच्या पडणा-या पावसामुळे काेयना धरणाची पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी धरण व्यवस्थापनेकडून गेल्या दाेन दिवसांपासून काेयना धरणातून माेठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आजही सुमारे ५० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असल्याने भाविकांनी कृष्णा काेयना नदीपात्रात बाप्पाच्या विसर्जनासाठी ganesh idol immersion जाऊ नये असे आवाहन तहसीलदार आनंदराव देवकर यांनी केले आहे. restriction-for-ganesh-idol-immersion-koyna-krishna-river-satara-marathi-news-sml80

गणेश विसर्जनासाठी कराड तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायतींना पथकांच्या नियुक्तीचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. या पथकांच्या माध्यमातून नागरिकांनी विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कृष्णा आणि काेयना नदीकाठी राहणा-या नागरिकांनी निर्माल्य देखील पाण्यात टाकण्यासाठी जावू नये असेही स्पष्ट करण्यात आले.

ganesh idol immersion
काेल्हापूरवासियांनाे! बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालात? हे वाचा

दरम्यान कराड पालिका आणि पाेलिस दलाने कराड येथील प्रितीसंगमावर गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. याबराेबरच पालिकेने १४ वाॅर्डात १४ फिरती मूर्ती संकलन केंद्रे तयार केली आहेत. यावर्षी सुमारे २९ हजार घरगुती गणेशाच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून एकही गणेश मूर्ती कृष्णा काेयना नदीत विसर्जित हाेणार नाही याची काळजी पालिका देखील घेणार आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com