सांगलीतील निर्बंध आणखी कडक होणार

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी निर्बंध आणखी कडक केले आहेत
सांगलीतील निर्बंध आणखी कडक होणार
सांगलीतील निर्बंध आणखी कडक होणार SaamTv

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी निर्बंध आणखी कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला करत रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री आणि आठवडे बाजारावर बंदी घातली आहे. 19 जुलैपर्यंत जिल्ह्यात चौथ्या स्तराच्या लागू असलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील पालिका आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. Restrictions in Sangli will be tightened

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागलेली आहे. रोजचा आकडा हा हजारांच्या घरात पोहचत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हिटी दर हा, दहा ते वीस टक्क्यांच्या आत असल्याने सध्या सांगली जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश आहे.

सांगलीतील निर्बंध आणखी कडक होणार
विविध मागण्यांसाठी बसपाचे वर्ध्यात धरणे आंदोलन

19 जुलैपर्यंत चौथ्या स्तराचे निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत. मात्र रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लागू असलेले निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांवर विनापरवाना विक्री व्यवसायालाही बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहर आणि ग्रामीण भागात आठवडे बाजारांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील वस्तू घरपोच देण्याबाबत पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी संबंधित पालिका प्रशासनाला केल्या आहेत. सध्या सकाळी 7 ते 4 वाजे पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकान व भाजी मंडई या ठिकाणी विक्रीस परवानगी आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com