रायगडात मुसळधार; शेतात घुमू लागले खलाटीचे सूर

रायगडात मुसळधार; शेतात घुमू लागले खलाटीचे सूर
Rice Cultivation

- राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज (रविवार) सकाळ पासून रायगडमधील विविध भागात पाऊस सुरु आहे. पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्यात रखडलेली भात लावणीला जोर आला आहे. सद्यस्थितीत रायगडात 20 टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. सतत पाऊस पडत असल्याने लवकरच जिल्ह्यातील लावणीची कामे पूर्ण होतील असा विश्वास जिल्हा कृषी अधिकारी उज्वला बानखोले यांनी व्यक्त केला आहे. (rice-cultivation-raigad-raining-sunday-marathi-news)

रायगड जिल्ह्यात सात जूनपासून पावसाचे आगमन झाले. पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी भात लावणी सुरू केली. आठवडाभर पाऊस पडल्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली हाेती. त्यामुळे शेतकरी राजा चिंतातुर झाला. शेतात पाणी नसल्याने भात लावणी कामे रखडली होती. अनेक भागात भाताची रोपेही करपू लागली होती. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता.

Rice Cultivation
Weekend Lockdown : पर्यटकांनाे! महाबळेश्वरात गर्दी टाळा : सिंह

आता पुन्हा 10 जुलैपासून रायगड जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी भात लावणी कामास पुन्हा एकदा प्रारंभ केला आहे. त्यामुळे शेतात खलाटीचे सूर घुमू लागले आहेत. पाऊस सुरू झाल्याने आठ दहा दिवसांत जिल्ह्यातील भात लावणीची कामे पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्ह्यात शनिवारी (ता.10) दिवसभरात एकूण 292.20 मिलिमीटर पाऊस पडला आहे. याबराेबरच सरासरी 18.25 टक्के मिलिमीटर पाऊस झाला आहे. रागयड जिल्ह्यात जूनपासून ते आतापर्यत 1159.27 मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी 46.34 टक्के पाऊस पडला आहे अशी माहिती प्रशासनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com