Beed Accident: रिक्षा-कंटेनरचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तीन प्रवासी जखमी; पोलिसांनी कंटेनर चालकाला 40 किमी पाठलाग करुन पकडलं

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बीडच्या कोळवाडी फाट्यावर हा अपघात झाला आहे.
accident news
accident news saam tv

बीड : कंटेनर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन महिलांसह रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत . धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बीडच्या कोळवाडी फाट्यावर हा अपघात झाला आहे.

अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या कंटेनर चालकाला बीड ग्रामीण पोलिसांनी 40 किलोमीटर पाठलाग करत पकडलं आहे.

accident news
Chandrapur News: चंद्रपुरात तीन अल्पवयीन मुले तलावात बुडाले, बचाव पथकाकडून शोध सुरु

गंगुबाई रोकडे या 40 वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे. मयत गंगुबाई रोकडे या भंगार गोळा करून उपजीविका भागवत असत. गंगूबाई अन्य दोन महिलांसह मालवाहतूक करणाऱ्या रिक्षामधून बीड शहराकडे जात होत्या. दरम्यान कोळवाडी फाट्याजवळ आले असता रिक्षाला कंटनरने जोरदारची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचे दोन तुकडे झाले.

accident news
Maharashtra Governor : कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? कोश्यारींनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर चर्चांना उधाण

या भीषण अपघातात गंगुबाई रोकडे या जागीच ठार झाल्या, तर अन्य दोन महिलांसह चालक जखमी झाला आहे. दरम्यान धडक देऊन कंटेनर चालकाने कंटेनरसह घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र बीड ग्रामीण पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कंटेनरचा पाठलाग करुन पाडळसिंगीजवळ चालकाला ताब्यात घेतलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com