परभणीत पुरस्थिती; सततच्या पावसाने रस्ता गेला वाहून

पुरामुळे परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग 61 वरील पर्यायी रस्ता वाहून गेला आहे.
परभणीत पुरस्थिती; सततच्या पावसाने रस्ता गेला वाहून
परभणीत पुरस्थिती; सततच्या पावसाने रस्ता गेला वाहून saam tv

राजेश काटकर

परभणी जिल्ह्यातून सलग दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने थैमान घातलय. अनेक नद्यांना पुरजन्य स्थिती निर्माण झालीय. तर जोरदार पावसाने अनेक ठिकांनी रस्ते वाहून गेल्याची घटना घडली. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग 61 वरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असून, याठिकाणी बनविण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून, या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांना, सेलू किंवा सोनपेठ मार्गे पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Roads washed away by floods in Parbhani)

परभणीत पुरस्थिती; सततच्या पावसाने रस्ता गेला वाहून
'या' एसटी चालकाची हिम्मत तर बघा ! पुलावरून पाणी जात असतान घातली बस

ताडबोरगाव ते पेडगाव दरम्यान मागील अनेक महिन्यांपासून हे पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या खालून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र जोरदार पावसाने हा रस्ता वाहून गेल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.

तर परभणी जिल्ह्यात काल पावसाने तांडव घेतलं अस म्हणल्यास चूक ठरणार नाही. सलग सहा तास जिल्ह्यात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा, मात्र सर्व नागरिकांना आणि प्राण्यांना याची मोठी किंमत मोजावी लागली. अवघ्या काही तासात जिल्ह्यात 232 मी. मी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. शहरातील धार रोड लागत असलेल्या मानवी वस्त्यात पाणी शिरल्याने प्रशासनाने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं , तर सोनपेठ तालुक्यातील शिर्शी खुर्द गावातील ओढ्याला आलेल्या पुरामुळे 233 पेक्षाही अधिक मेंढ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुखत घटना ही घडलीय .

सोनपेठ तालुक्यातील शिर्शी(खुर्द) गावातील एकूण 10 मेंढपाळ हे मागील अनेक वर्षांपासून मेंढपाळच्या व्यवसाय करतात. सर्व मेंढ्या गावात एकाच ठिकाणी बांधलेल्या गोठ्यात ठेवत असतात. मात्र काल झालेल्या दमदार पावसामुळे 233 मेंढ्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाऊन त्यांच्या मृत्यू झाला आहे. या घटनेत मेंढपाळ करणाऱ्या मेंढपालांनी झाडावर चढून कसतरी आपला जीव वाचवला. कालच्या घटनेत मेंढपालांना लाखोंचा नुकसान झाल्याच बोललं जातं आहे.

Edited By - Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com