वृद्धांना लुटणारा भामटा जेरबंद! ATM कार्डची अदलाबदली करून लुबाडलं

...या आधी अट्टल आरोपीवर मुंबई, ठाणे, पुणे याठिकाणी गुन्हे दाखल.
वृद्धांना लुटणारा भामटा जेरबंद! ATM कार्डची अदलाबदली करून लुबाडलं
वृद्धांना लुटणारा भामटा जेरबंद! ATM कार्डची अदलाबदली करून लुबाडलंविजय पाटील

सांगली शहरातील (Sangali City) एटीएम सेंटरबाहेर थांबून वयोवृद्ध नागरिकांचे एटीएम हातचलाखीने बदलून त्यांच्या खात्यातील पैसे लंपास करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे. अमोल दिलीप सकटे असं अटकेतील आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर याआधी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून विविध बँकांचे 5 एटीएम, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.

तीन सप्टेंबर रोजी शिवपुत्र सोलापुरे हे सांगलीच्या वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यासाठी गेले होते, त्याठिकाणी पैसे निघाले नसल्याने ते जवळच असलेल्या दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये खात्यावरील बॅलन्स चेक करण्यासाठी गेले. तेव्हा तिथं उभ्या असलेल्या तरुणाला त्यांनी एटीएम कार्ड दिलं आणि पासवर्ड टाकून बॅलेन्स चेक करण्यास सांगितलं. त्यावेळी सदर तरुणाने एटीएमचा पासवर्ड पाहिला. त्यानंतर सोलापुरे यांना एटीएम परत करताना हातचालाखीने एटीएम कार्डची अदलाबदली केली. काही वेळातच आरोपीने सोलापुरे यांच्या अकॉऊन्टमधून १ लाख ३१ हजार ५१८ रुपये काढून घेतले. पैसे न काढताच डेबिटचा मेसेज आल्याने सोलापुरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वृद्धांना लुटणारा भामटा जेरबंद! ATM कार्डची अदलाबदली करून लुबाडलं
Breaking News: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावनी लांबणीवर

याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक चौकशी करत असताना पोलिसांना संशयिताची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अमोल सकटे या संशयित तरुणास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता. त्याच्या खिशात विविध बँकाची ५ डेबिट कार्ड्स, त्यावरील बँक, नंबर व नावे, एसबीआयचे २ कार्ड, बँक ऑफ महाराष्ट्रचे १ कार्ड आणि एस बँकेची २ कार्ड मिळाले. याबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने सर्व एटीएम कार्ड एटीएम सेंटरमधून वृद्धांची फसवणूक करून घेतल्याचं सांगितलं.

दरम्यान, वृद्धांची फसवणूक करून चोरलेल्या एटीएम कार्डवरून अमोल सकटे याने लाखो रुपये लंपास केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तसेच या आरोपी विरोधात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आणि पुणे येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com