लसीकरण पथक असल्याचा बनाव करत दरोडा टाकणारे सीसीटीव्ही मध्ये कैद

अकोल्यातील अकोट मध्ये काल भरदिवसा एका व्यापाऱ्याच्या घरी कोरोना लसीकरनाचे पथक असल्याचा बनाव करून दरोडा टाकण्यात आला होता.
लसीकरण पथक असल्याचा बनाव करत दरोडा टाकणारे सीसीटीव्ही मध्ये कैद
लसीकरण पथक असल्याचा बनाव करत दरोडा टाकणारे सीसीटीव्ही मध्ये कैदजयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील अकोट मध्ये काल भरदिवसा एका व्यापाऱ्याच्या घरी कोरोना लसीकरनाचे पथक असल्याचा बनाव करून दरोडा टाकण्यात आला होता. याप्रकरणी त्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला आहे.

हे देखील पहा -

अकोटमध्ये कोरोना लसीकरण पथक असल्याचे सांगत भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. अकोट मध्ये भरदिवसा गजबजलेल्या परिसरात ही काल घटना घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करुन तोडांत बोळे कोंबून दोरानं एका खालीत बांधून ठेवले होते.

लसीकरण पथक असल्याचा बनाव करत दरोडा टाकणारे सीसीटीव्ही मध्ये कैद
अनिल देशमुख यांचे जावई CBI च्या ताब्यात; चौकशीनंतर सुटका

या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.अकोट मधील प्रचंड रहदारी असलेल्या बुधवार वेस परिसरात प्रसिद्ध व्यापारी असलेले अमृतलाल सेजपाल हे  आपल्या कुंटबासह दुकानाच्या वरच्या माळ्यावर राहतात. सेजवाल यांच्याच घरी हा दरोडा पडला होता.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com