लसीकरण पथक असल्याचे सांगून घरावर टाकला दरोडा; दरोडेखोरांना केली पोलिसांनी अटक!

या दरोड्याचा मास्टर प्लॅन आखणारी त्याच घरची मोलकरीण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लसीकरण पथक असल्याचे सांगून घरावर टाकला दरोडा; दरोडेखोरांना केली पोलिसांनी अटक!
लसीकरण पथक असल्याचे सांगून घरावर टाकला दरोडा; दरोडेखोरांना केली पोलिसांनी अटक!अॅड.जयेश गावंडे

अकोला : कोरोना लसीकरणाचे पथक Corona Vaccination Squad असल्याचा बनाव करून दरोडा टाकणाऱ्या सहा दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात अकोट पोलिसांना Akot Police यश आले आहे. या सहा दरोडेखोरांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. अकोल्यातील अकोट मध्ये ही घटना घडली होती. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र दोन दिवसांच्या कालावधीतच या चोरट्यांना शोधण्यात अकोट पोलिसांना यश मिळविले आहे.Robbery at home claiming to be a vaccination squad

हे देखील पहा-

या सहा दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा मास्टर प्लॅन आखला होता. लसीकरण पथक असल्याचा बनाव करत अकोट मधील भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या दरोडा टाकला. मात्र ज्या घरी दरोडा टाकला तिथे अमृतलाल सेजपाल यांच्या नातीने संशय आल्याने आरडा-ओरड केल्याने दरोडेखोरांचा डाव फसला. संपूर्ण घटना क्रम पाहता पोलिसांनी चेहरा झाकलेल्या आरोपींच्या सीसी टीव्ही फुटेज आधारे शिताफीने या दरोडेखोरांना अटक केली आहे.

या दरोड्याचा मास्टर प्लॅन Master Plan आखणारी त्याच घरची मोलकरीण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहा जणांचा समावेश असून यातील तीन महिला व तीन पुरुष आहेत आरोपींमध्ये 1)विठ्ठल नामदेव टवरे वय पन्नास वर्ष 2)सौ वैशाली विठ्ठल टवरे वय 45 वर्ष दोन्ही रा शिवाजीनगर, मोठे बारगण, अकोट, जिल्हा अकोला 3)संगम गणेशराव ठाकरे वय 32 वर्षे 4)सागर गणेशराव ठाकरे वय 30 वर्ष 5)अमृता संगम ठाकरे वय 25 वर्ष राहणार येवदा तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम रमुक्ताई संकुल, कबुतरी मैदान ,अकोट, जिल्हा अकोला 6)सीमा विजय निंबोकार वय 35 वर्षे राहणार नर्सिंग कॉलनी अकोट यांना अटक करण्यात आली आहे.

लसीकरण पथक असल्याचे सांगून घरावर टाकला दरोडा; दरोडेखोरांना केली पोलिसांनी अटक!
मनोहर मामाचा उंदर गावातील आश्रम बेकायदेशीर

काय होती नेमकी घटना-

बुधवार वेस अकोट येथे राहणारे अश्विन अमृतलाल सेजपाल वय 44 वर्ष हे त्यांचे कुटुंबासह खामगाव येथे त्यांच्या नातेवाईकांचे लग्न करता गेले असता त्यांच्या राहत्या घरी बुधवार वेस अकोट येथे त्यांचे वृद्ध आई-वडील एक मुलगी असे घरी हजर असताना दोन अनोळखी पुरुष व दोन महिला हे त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधून आपण कोरोना लस घेतलेली आहे का याबाबत विचारपूस करून आम्ही सर्वे करत आहोत असे सांगून फिर्यादीचे घरात जबरीने घुसून त्यांचे आई वडिलांचे व मुलीचे तोंडात कापसाचा बोळा घालून त्यांना मारहाण करून व त्यांचे हात-पाय बांधून घरातील नगदी रुपये व एक मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. मात्र संशय आल्याने चोरटे पळून गेले होते. अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे चार अनोळखी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 819/2021भादवि कलम 394,452, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सदर प्रकरणाची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीधर साहेब अकोला, अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे अकोट शहर यांच्या नेतृत्वात डीबी स्कॉड पोलिसांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com