घरमालकाच्या मुलाचे लक्ष गेल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला

अजय नाशिककर त्यांच्या स्टेशन रोड परिसरामध्ये कुणीही राहत नसल्याचे बघून चोरट्यांनी बंगल्यामध्ये कुलूप - कडी तोडून आत प्रवेश केला.
घरमालकाच्या मुलाचे लक्ष गेल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला
घरमालकाच्या मुलाचे लक्ष गेल्यामुळे चोरट्यांचा डाव फसलाभूषण अहिरे

धुळे - शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरी घरफोड्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अजय नाशिककर त्यांच्या स्टेशन रोड परिसरामध्ये कुणीही राहत नसल्याचे बघून चोरट्यांनी बंगल्यामध्ये कुलूप - कडी तोडून आत प्रवेश केला. नाशिककर यांचे एकत्र कुटुंब धुळे शहरातील आग्रा रोड येथे सध्या वास्तव्यास असून नाशिककर यांचा मोठा मुलगा काही कारणास्तव स्टेशन रोड परिसराकडे आला असताना त्याने बंगल्याकडे चक्कर मारला. यादरम्यान आपल्या बंद बंगल्या मध्ये लाईट लागले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. बंगल्याच्या आत मध्ये कुणीतरी असल्याचे देखील सावलीद्वारे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ वडिलांना फोन करून याबाबतची कल्पना दिली. robbery attempt failed because of son of the house owner watches to thief

हे देखील पहा -

नाशिककर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व चोरट्यांना त्यांचा सुगावा लागल्यामुळे चोरट्यांनी त्या ठिकाणाहून कुठलीही वस्तू सोबत न घेता पळ काढला. त्यानंतर नाशिककरांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. धुळे शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घरात पडलेले अस्ताव्यस्त सामान व तुटलेल्या कडीकोंड्या बरोबरच फिंगरप्रिंट एक्सपर्टच्या सहाय्याने पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com