बीडमध्ये दरोडा; महिलांच्या अंगावरील दागिने लुटून, पाच जणांना जबर मारहाण!

13 वर्षाच्या चक्रपाणी नावाच्या मुलाने, दरोडेखोरांना काय न्यायचे तर न्या, परंतु मारहाण करू नका, असे म्हटल्यानंतर दरोडेखोरांनी तुकाराम नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नीला घरात कोंडून सोडून दिले!
Robbery
Robbery Saam TV

बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बीडच्या पाटोदा शहरात दोन ठिकाणी मारहाण करत महिलांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटून बेदम मारहाण केलीय. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी असून एका वृद्धेला घरातून फरफटत नेत मक्याच्या शेतात टाकले. यामुळं नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. शेतकरी तुकाराम नाईकनवरे यांच्या पाटोदा (Patoda) शहरालगत असलेल्या घरावर हल्ला चढवून, घरातील सदस्यांना मारहाण करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड पळवून नेलीय.

हे देखील पाहा :

यावेळी दरोडेखोरांनी (Robbers) केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. असून एका वृद्धेला घरातून फरफटत नेत मक्याच्या शेतात टाकले. तर, 13 वर्षाच्या चक्रपाणी नावाच्या मुलाने, दरोडेखोरांना काय न्यायचे तर न्या, परंतु मारहाण करू नका, असे म्हटल्यानंतर तुकाराम नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नीला चोरट्यांनी घरात कोंडून सोडून दिले, प्रतिकार करणाऱ्या गणेश नाईकनवरेला मात्र प्रचंड मारहाण (Beating) केल्याने उपचारासाठी चौघांना, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी डीवायएसपी यांनी भेट असून या घटनेने पाटोदा शहरात प्रचंड भीतीचे (Fear) वातावरण निर्माण झाले आहे.

तर, या अगोदर दरोडेखोरांनी मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या मांजरे यांच्या निवासस्थानी दरोडा टाकून, त्या ठिकाणाहून नगदी रोकडसह ऐवज चोरून नेलाय. त्यानंतर या दरोडेखोरांनी आपला मोर्चा पाटोद्यातील तुकाराम नाईकनवरे यांच्या घराकडे वळविला. चोरट्यांनी अगोदर बाहेरचे दार बळजबरीने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आतील दरवाजा वाजवला. तुकाराम यांची सून गिता हिने दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी तिच्या डोक्यात काठीने जबर वार केला.

Robbery
राज्यात शेतकरी आत्महत्येत अमरावती जिल्हा अव्वल!

याच वेळी गिता यांचा नवरा गणेश नाईकनवरे उठला आणि दरोडेखोरांचा प्रतिकार करू लागला, त्यावेळी दरोडेखोरांनी गणेशला प्रचंड मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातला गोंधळ ऐकून तुकाराम नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या उठल्या. यावेळी त्यांच्या गळ्यातील, हातातील सोन्या - चांदीचे दागिने हिसकावून नेत त्यांनाही मारहाण केली. लक्ष्मीबाईला घरातून फरफटत नेत शेतातील मकाच्या शेतात फेकून दिले.

त्यावेळी तुकाराम यांचा 13 वर्षीय नातू चक्रपाणी याने दरोडेखोरांना मारहाण करू नका, काय घेऊन जायचे ते जा, असे म्हटल्यानंतर तुकाराम आणि लक्ष्मीबाईंना त्यांनी एका खोलीत कोंडून टाकले. दरोडेखोरांचा हा धुमाकूळ तब्बल एक तास सुरू होता. दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Robbery
अहमदनगरच्या पालकमंत्री पदाची धुरा तनपुरेंच्या खांद्यावर?

यामध्ये लक्ष्मी तुकाराम नाईकनवरे, ओंकार गणेश नाईकनवरे, गणेश तुकाराम नाईकनवरे, गिता गणेश नाईकनवरे यांचा समावेश आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . दरम्यान दरोडेखोरांनी दोन्ही महिलांच्या अंगावरील दागिने आणि 70 कट्टे विकलेल्या तुरीची काल आलेल्या पट्टीची रोख रक्कम लुबाडून दरोडेखोर पसार झाले आहेत.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी बीड (Beed) शहरात देखील सात ते आठ चोरट्याच्या टोळीने दहशत माजवली होती. त्याचबरोबर जिल्ह्यातील नेकनूर, चौसळा, माजलगाव गेवराई सह जवळपास अनेक ठिकाणी चोरट्यांनी दहशत पाहायला मिळत असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com