ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरल्याने पवारांनी भाजपला खिजवलं
आमदार रोहित पवार

ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरल्याने पवारांनी भाजपला खिजवलं

अहमदनगर ः कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वच नेते त्यांच्या अभ्यासू टीकेचे धनी ठरतात. पेट्रोल दरवाढ असो नाही तर केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण. प्रत्येक निर्णयाची ते आपल्या अभ्यासातून चिरफाड करीत असतात. यावेळी निमित्त आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरल्याचे.

आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी भाजपला खिजवलं आहे. प्रश्नम या संस्थेच्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत. ठाकरे सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, अशी आवई भाजपने उठवली होती. परंतु प्रश्नमच्या सर्व्हेक्षणात ते उघडे पडले आहेत. विशेष म्हणजे भाजप सत्तास्थानी असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री देशात थेट पाचव्या स्थानावर राहिले आहेत.Rohit Pawar criticizes BJP again

आमदार रोहित पवार
लोकसभा निवडणुकीपूर्वीच खासदार सुजय विखे हे लंकेंना घाबरलेत

प्रश्नम या संस्थेने देशात तेरा राज्यांत हा सर्व्हे केला. या सर्व्हेक्षणाचा निकाल आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि मित्र पक्षांचे हे सरकार आहे. हे यश त्यांचेच आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे मानतात.

प्रश्नम या संस्थेने सर्व्हेक्षणासाठी देशातील तेरा राज्ये निवडली होती. त्यात गोवा, गुजरात, हरियाणा, बिहार, झारखंड, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तरा खंड ही राज्य होती. या संस्थेने सर्व्हेक्षणात तुमचा आवडता मुख्यमंत्री कोणत्या राज्याचा, असा प्रश्न विचारला होता. त्यात ठाकरे यांनी चांगली मते घेतली. एकूण मतदानाच्या तब्बल ४९ टक्के मते मिळवत देशात आपली लोकप्रियता टिकवली. Rohit Pawar criticizes BJP again

विशेष म्हणजे भाजपने त्यांना सर्वात निकम्मे मुख्यमंत्री अशी उपाधी देत डिवचले होते. तेच नंबर वन ठरल्याने रोहित पवारांनी भाजपला त्यांच्या टीकेची आठवण करून दिली आहे. ट्विटरमध्ये ते म्हणतात, उठसूट आमच्यावर टीका करणाऱ्या भाजपचे आवडते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तब्बल पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. ही तुमच्यासाठी वाईट बातमी आहे, असा त्यांच्या ट्विटचा सारांश आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com