तुमची चलाखी देशात कुठेही चालेल पण महाराष्ट्रात नाही; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीका

राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवारांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे.
तुमची चलाखी देशात कुठेही चालेल पण महाराष्ट्रात नाही; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीका
"तुमची चलाखी देशात कुठेही चालली असती पण ती महाराष्ट्रात चालणार नाही" ; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीकाSaam Tv

देशात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या Petrol-disel दरांमध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. यावरुनच काँग्रेस Congress केंद्र सरकार विरोधात राज्यभर आंदोलनही करत आहेत. मात्र राज्यातील विरोधी पक्षनेते opposition leader मात्र या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरत आहेत.Rohit Pawar criticizes Devendra Fadnavis

काल पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये महागाईच्या मुद्यावरुन बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असे विधान केले होते मात्र ते विधान खोटे असून भाजप नेत्यांना खोटं बोलायची सवयच असल्याची टीका रोहीत पवारांनी आपल्या ट्विटरवरुन केली आहे.

यासंदर्भात त्यांनी फडणवीसांच्या विधानाचे खंडण करणारा एक व्हीडिओसुध्दा ट्विटरवरुन प्रसारित केला आहे. शिवाय फडणवीसांच वक्तव्य हास्यास्पद असल्याचही रोहीत पवार म्हणाले आहेत.Rohit Pawar criticizes Devendra Fadnavis

असा टोलाही रोहीत पवारांनी देवेंद्र फडणवीसांना ट्विटरवरुन Tweeter लगावला.

Edited By - Jagdish Patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com