तरूणाईला मिळणार रोहित पवारांमुळे "बळ"

रोहित पवार
रोहित पवार

अहमदनगर ः विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्यामागे दोन्ही तालुक्यातील तरूणाई मोठ्या प्रमाणात उभी राहिली होती. कोणत्याही नेत्यामागे प्रथमच कर्जत आणि जामखेड तालुक्यातील तरूणांनी अशी ताकद उभी केली होती. मतदारसंघातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील तरूण त्यांचे फॅन आहेत. त्यांच्यासाठी रोहित पवार नेहमीच आक्रमक भूमिका मांडत असतात. त्यांच्यासाठीच्या स्पर्धा परीक्षा, नोकरभरती, व्यायामाचे साहित्य असेही त्यांच्याकडून मदत स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते.Rohit Pawar gave sports equipment to the youth of Karjat-Jamkhed

विधानसभा निवडणूक कालावधीत प्रचारादरम्यान बऱ्याच गावांमधून युवक वर्गाने आमदार रोहित पवार यांचेकडे व्यायाम शाळा व व्यायाम साहित्य मिळावे अशा प्रकारची मागणी सातत्याने लावून धरली होती. त्या अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी नियोजनमधून जिल्हा क्रीडा विभागाला निधी देत असताना ग्रामीण भागातील तरुणांमध्ये पोलीस भरती किंवा सैन्य भरतीसाठी जाण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना व्यायाम साहित्याची उणीव भासते. त्यामुळे व्यायामाची आवड असणाऱ्या युवकांची गैरसोय होते. त्यामुळे नियोजनच्या निधीतून ग्रामीण भागात व्यायाम साहित्य पुरवण्यात यावे अशी सूचना आमदार रोहित पवार यांनी केली होती.

रोहित पवार
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

माहे जानेवारी 2021 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील व तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्याशी आमदार रोहित पवार यांनी मीटिंग घेऊन कर्जत-जामखेडमधील प्रस्तावातील असलेल्या गावांमध्ये व्यायाम शाळा व व्यायाम साहित्य पुरवणे याबाबत चर्चा केली होती. त्या अनुषंगाने मिरजगाव जिल्हा परिषद गटातील चिंचोली काळदात, मांदळी, नागमठाण, तिखी, चिंचोली रमजान, थेरगाव, घुमरी, बेलगाव, दिघी, टाकळी खंडेश्वरी, रवळगाव, खुरंगेवाडीसह कर्जत तालुक्यातील एकूण 31 व जामखेड तालुक्यातील 12 गावांना मंजुरी मिळाली आहे. त्या काही दिवसांमध्येच सदर साहित्याची जोडणी होऊन तरुण वर्गाला ते साहित्य वापरता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते यांनी दिली.Rohit Pawar gave sports equipment to the youth of Karjat-Jamkhed

कोट्यवधी रुपयांच्या निधी मंजुरीचे खोटे बॅनर लावून निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न करता येतो परंतु मतदारांची मने जिंकायला वास्तववादी विकासच कामाला येतो, असे मत रघुनाथ काळदाते यांनी व्यक्त केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com