रोहित पवारांची स्वराज्य ध्वज यात्रा रात्री उशिरा शेगावात दाखल
रोहित पवारांची स्वराज्य ध्वज यात्रा रात्री उशिरा शेगावात दाखलSaam Tv

रोहित पवारांची स्वराज्य ध्वज यात्रा रात्री उशिरा शेगावात दाखल

रोहित पवार उभारणार जगातील सर्वांत उंच ध्वज

बुलढाणा - राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील अहमदनगर Ahmednagarजिल्ह्यातील खर्डा किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या 74 मीटर भव्य भगव्या स्वराज्य ध्वजाची पुजा करून राज्याच्या दौऱ्यावर ही यात्रा निघाली आहे. रविवारी रात्री ही यात्रा नियोजित वेळेपेक्षा ४ तास उशिराने बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील शेगावमध्ये पोहचली.

हे देखील पहा -

तेव्हढ्याच रात्री शहरात ठिकठिकाणी स्वागत आणि रस्त्यांवर असलेले विविध संत आणि महात्म्याच्या पुतळ्यांचे हार टाकून पूजन करण्यात आले. संत गजानन महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर स्वराज्य ध्वजासह संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. रात्री उशिरा साडे दहा वाजता ही यात्रा शेगाव शहरात दाखल झाली. तेव्हढ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी जोमाने ठिकठिकाणी स्वागत सत्कार केले.

रोहित पवारांची स्वराज्य ध्वज यात्रा रात्री उशिरा शेगावात दाखल
येलदरी, सिद्धेश्वर आणि ईसापुर 98 टक्क्यांवर; गावांना सतर्कतेचा इशारा

रात्री विश्राम भवनासमोर पदाधिकारी यांनी भगवे फेटे घालून ध्वजाचे पूजन केले. यानंतर रात्री शहरात विश्राम भवन ते मंदिर ठिकठिकाणी स्वागत आणि रस्त्यांवर असलेले विविध संत आणि महात्म्याचे पुतळ्यांचे हार टाकून पूजन करण्यात आले. संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. ही स्वराज्य ध्वज यात्रा पुढील जिल्ह्यासाठी रवाना झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com