माझी नाही, लोकांचीच जिरली! पराभवानंतर राम शिंदेंचे विश्लेषण

माझी नाही, लोकांचीच जिरली! पराभवानंतर राम शिंदेंचे विश्लेषण

अहमदनगर - भाजपातून राष्ट्रवादीत आउटगोइंग सुरू आहे. परंतु माजी मंत्री राम शिंदे याविषयी बेफिकीर आहेत. लोकं हुक लावल्यामुळे तिकडं जात आहेत. थोडं थांबा हे सगळं वातावरण आता बदलणार आहे. निवडणूक आली की सगळं वातावरण आपल्या बाजूने होईल. गेल्या वेळी लोकं माझी जिरवायला गेले, परंतु आता त्यांच्या लक्षात आलंय आपलीच जिरलीय, अशा शब्दांत माजी मंत्री राम शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केली.

चापडगावच्या पंचायत समिती सदस्य ज्योतीताई प्रकाश शिंदे व सुनीताताई अशोक खेडकर यांच्या विकासनिधीतून चापडगाव, दिघी, निमगाव डाकू, आंबिजळगाव, निंबे, खांतगाव येथे विकास कामाचे उदघाटन चापडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री शिंदे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कोरोना लसीकरण, पीएम किसान योजना घरकुल योजना, डोल या कामांचे श्रेयही आमदार घेत आहेत. अहमदनगर ते करमाळा रस्त्याचे भूसंपादन सर्व पैसे प्रांत कार्यालयाच्या खात्यावर पडून आहेत. लवकरच त्या कामाचाही प्रारंभ होईल. चापडगावमध्ये तरसदरा वस्ती डांबरीकरण, सरकारी दवाखाना, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पेव्हर ब्लॉक व हायमॅक्स, यांचे भूमिपूजन करून शुभारंभ केला.

माझी नाही, लोकांचीच जिरली! पराभवानंतर राम शिंदेंचे विश्लेषण
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

अशोक काका व मा प्रकाश काका या जोडीने भरपूर निधी आणून कोरेगाव गटातील व चापडगाव पंचायत समिती गणातील विकास कामावर भर दिला. मागील दोन वर्षांपासून राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. मी आणलेल्या कामाचेच भूमिपूजने विरोधक करीत आहेत. कुकडीचे पाणी येण्याचा तर विषयच राहिला नाही. लोकांना त्यांनी भुरळ घातली, यावेळी तसं होणार नाही. प्रकाश काकांनी जे जे काम सांगितले ते पूर्ण केले.

या कार्यक्रमास अंबादास पिसाळ, अॅड. बाळासाहेब शिंदे, भगवानराव मुरूमकर, सुनील यादव, दादासाहेब सोनमाळी, पांडूरंग उबाळे, शैलेश चव्हाण, संभाजी सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com