लोकांसाठी सर्व अधिकारी एकाच छताखाली, रोहित पवारांचा उपक्रम

लोकांसाठी सर्व अधिकारी एकाच छताखाली, रोहित पवारांचा उपक्रम
रोहित पवार

नीलेश दिवटे

कर्जत : ‘‘मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यास कटिबद्ध आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत तुमची भेट घेण्यासाठी तुमच्या गावात आलो आहे. काही तक्रारी असतील तर निःसंकोचपणे सांगा,’’ असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमात ते माहिजळगाव येथे बोलत होते. या वेळी रघुनाथ काळदाते, नानासाहेब निकत, सावन शेटे, विष्णू खेडकर, रामदास चौघुले, मनोज खेडकर, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, सहायक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अशोक घुले, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेलेकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (Rohit Pawar will bring all the officers together)

रोहित पवार
नेवाशात मुरकुटे झाले सक्रिय, गडाखांनी मोठा हात मारलाय

आमदार पवार म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात महसूल, ग्रामपंचायत व वैद्यकीय अधिकारी एकाच छताखाली उपलब्ध होत कामाचा निपटारा जलद होण्यासाठी प्रयत्न आहे. प्रायोगिक तत्त्वावर जळगाव, पाटेगाव व चापडगाव येथे अधिकारी एकत्रित बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल.’’ (Rohit Pawar will bring all the officers together)

तर गय केली जाणार नाही

या वेळी सर्वाधिक तक्रारी महावितरणच्या आल्या. अनेक गावांत अधिकारी चांगले; मात्र कर्मचारी स्थानिक असल्याने काहींना जलद, तर काहींना त्रासदायक सेवा देतात. यावर, यापुढे शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांनी त्रास दिला, तर गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com