बारामती ः खर्डा येथे उभारण्यात येणाऱ्या भगव्या ध्वजाची पूजा करताना संतपीठ.
बारामती ः खर्डा येथे उभारण्यात येणाऱ्या भगव्या ध्वजाची पूजा करताना संतपीठ.

रोहित पवार फडकवणार भगवा, तोही सर्वात उंच!

अहमदनगर ः कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या मतदारसंघाला विकासाचे मॉडेल बनविण्याचा चंग बांधला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते सातत्याने नवनवे उपक्रम राबवित आहेत. दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी एकात्मिक संस्था स्थापन केलीय. महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात.

विकासासोबतच रोजगार निर्मितीसाठीही त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. दोन्ही तालुक्यातील मोठी पर्यटन केंद्र आहेत. तेथे पर्यटक आले पाहिजे, यासाठी पवार यांनी मिलिंद गुणाजी यांच्या माध्यमातून प्रयत्न केला. आता खर्डा किल्ल्यावर एक वेगळाच उपक्रम राबवित आहेत.Rohit Pawar will hoist the tallest saffron flag at Kharda fort

बारामती ः खर्डा येथे उभारण्यात येणाऱ्या भगव्या ध्वजाची पूजा करताना संतपीठ.
तालिबानची भिती; उडत्या विमानाला लटकलेल्या दोघांचा खाली पडून मृत्यू

जामखेड तालुक्यात खर्डा किल्ला आहे. निजामाच्या ताब्यातील हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता. मराठ्यांच्या इतिहासातील तीच शेवटची विजयी लढाई ठरली. त्यामुळे या किल्ल्याला आणि परिसराला मोठे महत्त्व आहे. या किल्ल्यावर सर्वात उंच भगवा ध्वज फडकवला जाणार आहे.

आमदार पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित तसेच व्हिडिओ बनवून या स्वराज्य ध्वजाच्या उभारणीविषयी माहिती दिलीय. ते लिहितात, सर्वांचाच अभिमान, सर्वस्व आणि स्फूर्तिस्थान आहे. परमार्थ, त्याग शिकवणारा सर्वोच्च मानबिंदू आहे. भारतीय संस्कृतीचं शाश्वत सर्वमान्य प्रतीक आहे. पाली वाङ्मयात अनेक ठिकाणी सर्वगुणसंपन्न गौतम बुध्दांना उद्देशून 'भगवा' शब्द आला आहे. बौद्धगुरूंच्या वस्त्रामध्ये भगव्या रंगाला विशेष स्थान आहे. भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून समानतेचा, एकीचा संदेश देणारा आहे.

इथं प्राणपणाने लढणाऱ्या शूर मराठी सैनिकांनी विजयाचं स्वप्न पाहिलं आणि भगव्याच्या साक्षीने ते साकारही केलं. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून कर्जत-जामखेडकरांनी या परिसराला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प केला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवली जाणार आहे.Rohit Pawar will hoist the tallest saffron flag at Kharda fort

काय आहेत वैशिष्ट्ये

तब्बल १८ टन वजन असलेल्या खांबावर ९० किलो वजनाचा आणि ९६x६४ फूट अशा भव्य-दिव्य आकाराचा हा स्वराज्य ध्वज आकाशाला गवसणी घालणाऱ्या ७४ मीटर उंचीवर डौलाने फडकणार आहे. या ध्वजाचं पूजन संतपीठाच्या हस्ते करण्यात आलं आहे. आगामी दोन महिन्यात देशभरातील प्रमुख ७४ अध्यात्मिक, धार्मिक स्थळी, संतपीठं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्यांच्या ठिकाणी, तसंच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), शाहू-फुले-आंबेडकरांच्या स्मारकाच्या ठिकाणी, वर्ध्यात महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम आदी ठिकाणी नेऊन ध्वजाचे पूजन केले जाईल. पंढरीत पूजन केल्यानंतर खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यासमोर या स्वराज्य ध्वजाची मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना केली जाईल. दि. १५ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम नियोजित केला आहे.

Edited By - AShok Nimbalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com