'असं' झाल्यास भाजपचं देशपातळीवर मोठं नुकसान होईल, भाजप-मनसे युतीबाबत आठवले म्हणाले...

आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesaam tv

मावळ : महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय वर्तुळात अत्यंत महत्वाची असणारी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी (bmc election) प्रत्येक पक्षाकडून रणशिंग फुंकलं जात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच भाजपसोबत मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आरपीआय आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीत मनसेला घेवू नका.असं झाल्यास भाजपचं देशपातळीवर मोठं नुकसान होईल, असं विधान आठवले यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. (Ramdas Athawale latest news update)

Ramdas Athawale
Shivsena Vs Shinde Group : शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र; उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप

लोणावळ्यात आरपीआयचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी आठवले यांनी भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजप-मनसे युतीबाबत आठवले यांनी मोठं विधान केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेसोबत युती करणार नाही, असा शब्द दिला होता. आरपीआय आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीत मनसेला घेवू नका.असं झाल्यास भाजपचं देशपातळीवर मोठं नुकसान होईल, असं वक्तव्य आठवले यांनी लोणावळ्याच्या कार्यक्रमात केलं.

Ramdas Athawale
मुंबईतील भाविकांचा ऋषिकेशमध्ये गंभीर अपघात; अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी सूर्यकांत वाघमारे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना भाजप-मनसे युतीच्या चर्चेवर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट भाजपशी जोडला गेल्याने युतीची ताकद वाढलीय.अशा परिस्थितीत विभिन्न विचारसरणीच्या मनसेसोबत युती करू नये, अशी आरपीआयची भूमिका असल्याचं आठवले म्हणाले. दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवाजी पार्क मैदान मिळावं. यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. मुंबई महापालिकेने खरी आणि ताकदवान शिवसेना कोणती हे पाहून निर्णय घ्यावा, असा सल्लाही आठवलेंनी दिला.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com