बाब्बो! नाल्यात वाहू लागल्या 500 रुपयाच्या नोटा; लोकं झाली मालामाल

उदगीर शहरात रात्रभर पावसाने हजेरी लावली होती या पावसाच्या पाण्याने 500 रुपयांच्या नोटा नालीवाटे वाहून जात असल्याची चर्चा परिसरात जोर धरली आहे.
बाब्बो! नाल्यात वाहू लागल्या 500 रुपयाच्या नोटा; लोकं झाली मालामाल
बाब्बो! नाल्यात वाहू लागल्या 500 रुपयाच्या नोटा; लोकं झाली मालामालदिपक क्षिरसागर

आज लातूर जिल्ह्यातील (Latur District) उदगीर शहरातील एका नालीत 500 रुपयाच्या नोटा वाहत आल्या त्यात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळल्या त्यापैकी ज्याला जमेल तश्या त्यांनी ढापल्या यावरून उदगीर शहरात मोठी खळबळ उडाली उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालयाजवळ आज 14 जुलै रोजी मंगळवारी नालीत वाहुन जात असताना 500 रुपयांच्या अनेक नोटा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

उदगीर शहरात रात्रभर पावसाने हजेरी लावली होती या पावसाच्या पाण्याने 500 रुपयांच्या नोटा नालीवाटे वाहून जात असल्याची चर्चा परिसरात जोर धरली आहे. या नोटांची माहिती उदगीर शहर पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन 500 च्या काही नोटा ताब्यात घेतल्या आहेत.

नालीवाटे वाहत असलेल्या 500 च्या नोटा फाटलेल्या अवस्थेत आढळून आल्या तर काही उत्तम स्थितीत होत्या या पैकी ज्या नागरिकांनी पहिल्या त्यांनी ढापल्या तर काही नोटा पोलिसांना सापडल्या या नोटांची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना बोलावून नोटा खऱ्या की खोट्या याची खात्री केली असता या खऱ्या नोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नोटा कोणाच्या आहेत नालीच्या पाण्या सोबत कोठून वाहून आल्या याबद्दल अधिक माहिती प्राप्त झाली नाही या नोटा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com