RSS dasara melava: समाजाला तोडणारी नव्हे जोडणारी भाषा वापरायला हवी - मोहन भागवत

त्याग आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी परिश्रम केले आहे. स्वातंत्र्य कशासाठी हवी आहे, या मुद्यावर देखील त्याकाळी संघर्ष झाला.
समाजाला तोडणारी नव्हे जोडणारी भाषा वापरायला हवी - मोहन भागवत
समाजाला तोडणारी नव्हे जोडणारी भाषा वापरायला हवी - मोहन भागवत Facebook/@RSSOrg

नागपूर - आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा RSS विजयादशमी कार्यक्रम होत आहे. दसऱ्याच्या दिवशी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. कोरोनामुळे यंदा 200 लोकांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम होत आहे. आज सकाळी 7.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. संघासाठी विजयादशमी कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातो. कारण संघाचा हा एकमेव असा कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमात सरसंघचालक स्वयंसेवकांना आपल्या भाषणातून दिशानिर्देश देत असतात. सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विषयांवर भाष्य करतात. मर्यादित संख्येत कार्यक्रम होत असल्याने इतर स्वयंसेवकांना सरसंघचालकांचे भाषण ऐकता यावे यासाठी शहरातील 45 ठिकाणी स्क्रिन लावण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा -

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत Mohan Bhagwat यांनी 'शस्त्र पूजा' केली आहे. मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. आपण आपल्या स्वातंत्र्याचा आणि फाळणीचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. पुन्हा आपण विभाजित होऊ नये, यासाठी हा इतिहास आपल्याला माहिती असायला हवा. समाजाला तोडणारी नव्हे जोडणारी भाषा वापरायला हवी. लोकांमधील संवाद सकारात्मक असायला हवा असे देखील ते यावेळी म्हणले.

मोहन भागवत यांनी आपल्या मनोगताची सुरुवात करताना म्हणले की, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याग आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी परिश्रम केले आहे. स्वातंत्र्य कशासाठी हवी आहे, या मुद्यावर देखील त्याकाळी संघर्ष झाला.

समाजाला तोडणारी नव्हे जोडणारी भाषा वापरायला हवी - मोहन भागवत
विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची झुंबड...

स्वातंत्र्यावेळी देशाचे विभाजन झालं. तो अत्यंत दुःखद इतिहास आहे. तो इतिहास जाणून घेतला पाहिजे. शत्रूता आणि फुटीरता आपल्याला पुन्हा नको आहे. मात्र, तो इतिहास नव्या पीढीने जाणून घेतला पाहिजे. हरवलेली अखंडता परत मिळवण्यासाठी जुना इतिहास जाणून घ्यायला हवा.

पुढे ते म्हणाले की,नव्या तंत्रज्ञानावर कसले ही बंधन नाही आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कसली कसली चित्रे येतात. लॉकडाऊनमध्ये मुलांच्या हातात मोबाईल आला. ते काय पाहत होते? यावर काही नियंत्रण नाही. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर होत आहे. बिटकॉईन सारखी करन्सी आहे, त्यावर कोणाचं नियंत्रण आहे माहित नाही. देशात अंमली पदार्थांचा वापर वाढत चालला आहे. ते कसे थांबवावं माहित नाही.या व्यापारातून येणारा पैसा कुठे जातो हे आपल्याला माहित आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com