दहशतवादी संघटनेकडून RSS कायम टारगेट; 2006 मध्येही दहशतवादी हल्ला

कट्टर हिंदुत्ववादी संघटना अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख. देशातील हिंदूंच्या हिताच्या अनुषंगाने संघ नेहमीच आग्रही राहिलाय.
दहशतवादी संघटनेकडून RSS कायम टारगेट; 2006 मध्येही दहशतवादी हल्ला
दहशतवादी संघटनेकडून RSS कायम टारगेट; 2006 मध्येही दहशतवादी हल्ला

नागपूर : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाची दहशतवादी संघटनेकडून रेकी केल्याच्या घटनेनंतर संघ पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांच्या रडारवर असल्याचं उघड झालं आहे. कट्टर हिंदुत्ववादी (Hindu) संघटना अशी ओळख असल्यानं पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांसाठी संघ नेहमीच टारगेट राहिलं आहे. दहशतवादी संघटनेकडून संघ मुख्यालयाची रेकी केल्यावर संघ सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कट्टर हिंदुत्ववादी संघटना अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख. देशातील हिंदूंच्या हिताच्या अनुषंगाने संघ नेहमीच आग्रही राहिलाय. त्यामुळं देशातील मोठा हिंदू समुदाय संघाशी जोडल्या गेलाय. त्यामुळंचं पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर संघ असतो. संघावर यापूर्वी हल्ल्याच्या प्रयत्न आणि हल्ला झालाय. पहिल्यांदा 6 डिसेंबर 1998 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यावर संघावर हल्ला होईल अशी माहिती होती. मात्र, सुरक्षा व्यवस्था चोख असल्यानं तो हल्ला झाला नाही. त्याच महिन्याच्या शेवटी संघ कार्यालयात संघाच्या 500 पदाधिकाऱ्यांची बैठक होती. त्यावेळी सुद्धा हल्ला होणार, बिहार मधून दहशतवादी निघाले अशी माहिती होती. मात्र, हल्ला झाला नाही.

दहशतवादी संघटनेकडून RSS कायम टारगेट; 2006 मध्येही दहशतवादी हल्ला
Nashik: पोलीस स्टेशनसमोरच काढली मुलीची छेड, अपहरणाचाही प्रयत्न

1 जून 2006 मध्ये मात्र पहाटेच्या वेळी तीन दहशतवाद्यांना संघ मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी आले होते. मात्र, पोलिसांनी हा हल्ला परतवून आणत तीनही दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यावेळी आरडीएक्स, ए के 47, हॅन्ड ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर संघाभोवती सुरक्षा वाढविली. आता पुन्हा रेकी केल्यानं संघ दहशतवाद्यांचा रडारवर असल्याचं स्पष्ट होतंय.

पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना या नेहमी हिंदू मुस्लिम द्वेष पसरविण्याचं काम करते. हिंदूं संघटनांना टार्गेट करून हिंदू मुस्लिम वाद पेटविण्याचं काम करतात. संघ हा त्यांच्यासाठी सॉफ्ट टारगेट आहे. संघावर हल्ला म्हणजे हिंदूंवर हल्ला, असा या दहशतवादी स संघटनांचा समज आहे. त्यामुळंच संघ या दहशतवादी संघटनेचे निशाण्यावर असतात.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com