Maharashtra Politics: 'हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार...' रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा; प्रकरण काय?

Rupali Chakankar Vs Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या संसदेतील भाषणावरुन अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
Rupali Chakankar Vs Supriya Sule
Rupali Chakankar Vs Supriya SuleSaamtv

Rupali Chakankar News:

संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भ्रष्टाचार केला असेल तर चौकशी करा... असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्या या भाषणावरुन अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

Rupali Chakankar Vs Supriya Sule
Jayant Patil News: 'नेत्यांना सुबुद्धी देवो, फोडाफोडीचे राजकारण थांबावे...' जयंत पाटील यांचे गणरायाला साकडे, सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे.?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिंचन घोटाळा केल्याचे त्यांनी म्हणले होते. याच आरोपांवरुन संसदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींवर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भ्रष्टाचार केला असेल तर चौकशी करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत.. असे त्या म्हणाल्या...

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हे विधान करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यांच्या याच टीकेला अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. रुपाली चाकरणकर यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळेंवर टीकी केली आहे.

रुपाली चाकणकर यांचा पलटवार...

राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून गेल्या एक-दीड महिन्यांमध्येच वाढत असलेली काही आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी पाहून आश्चर्य वाटतं. मुळात हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे, असे रुपाली चाकणकर यांनी या ट्वीटमध्ये म्हणले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com