Saam News Impact: तळवाडे ग्रामपंचायतीनं मजूरांवरील बहिष्कार मागे घेत मागितली माफी

निर्णय नजरचुकीने घेतल्याचा खुलासा ग्रामपंचायतीने केला असुन कोणत्याही मजुरांवर अन्याय होऊ देणार नाही अशी कबुली ग्रामपंचायतीने दिली आहे.
Saam Impact: तळवाडे ग्रामपंचायतीनं मजूरांवरील बहिष्कार मागे घेत मागितली माफी
Saam Impact: तळवाडे ग्रामपंचायतीनं मजूरांवरील बहिष्कार मागे घेत मागितली माफीSaam Tv

नाशिक: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील तळवाडे ग्रामपंचायतीने गावातील मजूरांबद्दल घेतलेल्या चुकीच्या भुमिकेबद्दल माफीनामा (Apologies) जाहीर केला आहे. साम टिव्हीच्या बातमीने (Saam Impact) ग्रामपंचायत खडबडून जागी झाली आणि माफिनामा जाहिर केला आहे. जे मजूर गावाबाहेर मजुरीसाठी जाणार त्यांच्यावर बहिष्कार (Boycott) टाकण्याचा संतापजनक निर्णय पालिकेने घेतला होता, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर त्यानंतर निर्णय नजरचुकीने घेतल्याचा खुलासा ग्रामपंचायतीने केला असुन कोणत्याही मजुरांवर अन्याय होऊ देणार नाही अशी कबुली ग्रामपंचायतीने दिली आहे. (Saam News Impact: Talwade Gram Panchayat withdraws boycott of workers and apologizes)

हे देखील वाचा -

Saam Impact: तळवाडे ग्रामपंचायतीनं मजूरांवरील बहिष्कार मागे घेत मागितली माफी
तळवाडे ग्रामपंचायतीचा अजब फतवा; गावातील मजुरांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

या प्रकरणी माफी मागत असल्याचा खुलासा करत ग्रामपंचायतीने (Grampanchayat) आपल्या माफिनाम्यात लिहिलं की, शेतकरी बांधव व मजुर बांधव यांच्यात काही नियमावली करण्यात आली, त्यात काही नियम बहुसंख्य शेतकरी वर्गाने काही नियम चुकीचे लावले गेले आहेत. आजच्या परिस्थितीत गावी शेतकरी वर्गाला शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाही. त्यासाठी गावातील शेतकरी वर्ग व मजूर वर्ग यांनी रविवार दि. १९/१२/२०२१ रोजी एकत्र येवुन सामंजस्याने विषय घेतला असुन त्यात नजरचुकीने बहीष्काराचा विषय झाला आहे. अशा प्रकारचा अन्याय कोणत्याही मजुरावर होऊ देणार नाही. अशी ग्वाही ग्रामपंचायत देत आहे आणि झालेल्या प्रकाराबाबत ग्रा.पं. सरपंच माफी मागत आहे. सदरचे पत्र ग्रामपंचायत मागे घेत आहे, असं ग्रामपंचायतीने म्हटलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com