Ganeshotsav : कोरोनामुळे सचिनचा गणेशोत्सव सलग दोन वर्षे कुवेत मध्येच!

देशात अथवा परदेशात कानाकोपऱ्यात राहणारा कोकणी माणूस हा गणेशोत्सव सणाला आवर्जून आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाला गावाला येत असतो.
Ganeshotsav : कोरोनामुळे सचिनचा गणेशोत्सव सलग दोन वर्षे कुवेत मध्येच!
कोरोनामुळे सचिनचा गणेशोत्सव सलग दोन वर्षे कुवेत मध्येच!राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : देशात अथवा परदेशात कानाकोपऱ्यात राहणारा कोकणी माणूस हा गणेशोत्सव सणाला आवर्जून आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाला गावाला येत असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे गणेशोत्सव सणाला अनेक परदेशातील चाकरमानी हा गावी पोहचलेला नाही. मात्र, असे असले तरी परदेशात राहणारे महाराष्ट्रीय नागरिक गणेशोत्सव आपल्या पद्धतीने साजरा करीत आहेत.

हे देखील पहा :

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मूळचे सचिन दत्तात्रेय तावडे हे कामानिमित्त कुवेत येथे दहा वर्षापासून राहत आहेत. कुवेत येथे एका कंपनीत ते अकाऊंट विभागात कार्यरत आहेत. दरवर्षी गणेशोत्सव सणाला सचिन तावडे हे आवर्जून अलिबाग येथे आपल्या घरी दाखल होतात. मात्र, दोन वर्षे सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे ते कुवेत येथेच घरच्या घरी गणरायाची आराधना करीत आहेत.

कोरोनामुळे सचिनचा गणेशोत्सव सलग दोन वर्षे कुवेत मध्येच!
Ganeshotsav : मराठी बांधवांनी पाकिस्तानात साजरा केला गणेशोत्सव (पहा VIDEO)

यावर्षी सचिन याने आपल्या रूममधील गणरायाच्या छोट्या मूर्तीची आज गणेशोत्सव निमित्त पूजा केली. कोकणी माणूस कुठेही राहिला तरी तो गणरायाची आराधना करण्यास विसरत नाही हे नक्की. गणेशोत्सव निमित्त सचिन याने सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com