'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर' असं सेनेचं वागणं : खाेत
sadabhau khot

'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर' असं सेनेचं वागणं : खाेत

Summary

साेलापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकला नंतर शिवसेना ठरलेले लग्न मोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पळून गेली अशी टीका रयत संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात केली. रयत क्रांती संघटनेकडून उसाला एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (मंगळवार) मोर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चासाठी सदाभाऊ खाेत साेलापूरात दाखल झाले आहेत. sadabhau-khot-addressed-media-in-solapur-criticises-shivsena-sml80

सदाभाऊ म्हणाले शिवसेना- भाजपा महायुतीने लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली. त्यामध्ये जनतेने महायुतीला आशीर्वाद ही दिला. मात्र,विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली. भाजपा बरोबर ठरलेल लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने पळून गेली अन् मोकळी झाली. त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांच्या म्हणण्यानुसार शिवसेना जर स्वतंत्र निवडणूक लढली असती तर त्यांना कळलं असतं असेही सदाभऊंनी नमूद केले. यापुर्वीच्या विधानसभा निवडणुकांत भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढून चांगल्या जागा मिळवल्या आहेत असा दाखला ही सदाभाऊंनी दिला.

sadabhau khot
Live : काेणी मारली बाजी, यशाेमती ठाकूर की बच्चू कडू; जाणून घ्या

उत्तरप्रदेशामध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावावा अशी मागणी सदाभाऊंनी केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणाऱ्या क्रूरक्रम्यांना फासावर लटकावा असेही सदाभाऊंनी नमूद केले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे एक विदुषका सारखेच आहे. महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे जे संकट उभे ठाकलं आहे. त्यासाठी पंचनामे न करता सरसकट तातडीने खरीप पिकाला ६० हजार आणि बागायती पिकास एक लाख रुपये प्रतिएकर अनुदान द्या अशी मागणी सदाभाऊंनी केली आहे.

दरम्यान रयत क्रांती संघटनेकडून उसाला एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (मंगळवार) मोर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चासाठी सदाभाऊ खाेत साेलापूरात दाखल झाले आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com