
पंढपूर - एक पोस्ट व्हायरल केली म्हणून केतकी चितळे (Ketaki Chitale) वर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत, तिच्या सारखचं आमचं पण हाल या सरकारने केलं आहे अशी मिस्किल टीका सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी केली.
देवेंद्र तुम्ही राज्यात पुन्हा येणार आहात. त्यावेळी मात्र बारामतीच्या गड्यांना आत घेवू नका असे आवाहन ही त्यांनी केले. अलीकडेच शरद पवार यांनी मी पुन्हा येणार या वरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती तोच धागा पकडून खोत म्हणाले की,होय राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणून येणार आहेत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. पण आम्हाला आता वेगळे देवेंद्र फडणवीस बघायचे आहे.
हे देखील पाहा -
पुढे ते म्हणाले की, उजनीतून बारामतीला एक थेंब ही पाणी जावू देणार नाही असा इशारा देखील सदभाऊ खोत यांनी यावेळी दिला. पालक मंत्र्यांनी "कंस मामा"ची भूमिका घेवून नये अन्यथा श्रीकृष्ण रूपी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कंस मामाला आम्ही गाडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथे जागर शेतकऱ्यांचा, आक्रोष महाराष्ट्राचा या यात्रेचा समारोप रात्री विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी उजनीच्या पाण्यासाठी आपण संघर्ष उभा करणार असल्याचे सांगत शरद पवार यांच्यावरही टिका केली.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.