
जालना: देशात महागाईनं कळस गाठला आहे. पेट्रोल, घरगुती गॅस (Gas) सिलिंडरसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या महागाईचं स्वागत करून टीकेचे धनी ठरलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संवाद यात्रेदरम्यान वाटुर फाटा येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावरही गंभीर आरोप केले.
माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संवाद यात्रेनिमित्त आले होते. त्यावेळी वाटुर फाटा येथे त्यांनी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली. मात्र, टीका करताना खोत यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिल्लरवाला गडी आहेत, असं खोत म्हणाले. तर अजित पवारांवरही त्यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली. तसेच आरोग्य भरतीच्या परीक्षेवेळी राजेश टोपे यांनी दहा ते पंधरा लाखांत उत्तरपत्रिका विकल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
'गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
राजद्रोहाच्या कायद्याच्या वैधला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना, या कलमाला सुप्रीम कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली. यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. राजद्रोहाच्या नावाखाली राणा दाम्पत्यावर या राज्य सरकारनं अन्याय केला आहे. त्यामुळं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.