सडावाघापुरने हिरवा शालू पांघरला, 'उलटा धबधबा' पर्यटकांना खुणावतोय

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
सडावाघापुरने हिरवा शालू पांघरला, 'उलटा धबधबा' पर्यटकांना खुणावतोय

तारळे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) धुमाकूळ घातला आहे. पावसाची संततधार सुरुच असल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाळ्यात पर्यटकांचं आकर्षण असलेलं धबधबेही पर्यटकांना खुणावू लागले आहेत. सडावाघापुर येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) पर्यटकांते लक्ष वेधू लागला आहे. जुलै ऑगस्टमध्ये सडावाघापुर पठारावर पर्यटकांची रीघ लागलेली असते. सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटक (Tourist at waterfall) या धबधब्यावर निसर्गाच्या कुशीत लपण्यासाठी येत असतात. सडावाघापुर आणि परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थही निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत असतात.

सडावाघापुरने हिरवा शालू पांघरला, 'उलटा धबधबा' पर्यटकांना खुणावतोय
'भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांचा अपमान केला'; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची टीका

सडावाघापुरने हिरवा शालू पांघरला आहे. विस्तीर्ण पठार,धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या,दाट धुके,धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारु घरे,थंडगार हवा, सोबत थुईथुई पाऊस,पठारावरुन दिसणारे निसर्गाचे नयनरम्य दृश्य व कोयनामाई, हिरवाईने नटलेले डोंगर, खोल दरी,डोंगराच्या कडे कपारीतून फेसाळत येणारे लहान मोठे धबधबे येथील निसर्ग सौंदर्यात भर घालतात. दरवर्षी पावसाळा सुरु झाला कि पर्यटक येथील उलट धबधबा पाहण्यासाठी भेट देतात. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने नुकताच उलटा धबधबा ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com