सात महिन्यात 64 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन,188 कोटींचे दान प्राप्त

मंदिर खुले झाल्यानंतर सात महिन्यातच 64 लाख भाविकांनी शिर्डीला येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्याचे देखील सांगितले आहे.
सात महिन्यात 64 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन,188 कोटींचे दान प्राप्त
Shirdi Newsगोविंद साळुंके

मोबीन खान

शिर्डी - दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर साई मंदिर ऑक्टोबर 2021 मध्ये खुले झाले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात साईंच्या झोळीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे. शिर्डी (Shirdi) साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी ही अधिकृत आकडेवारी दिली आहे. त्याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर सात महिन्यातच 64 लाख भाविकांनी शिर्डीला येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्याचे देखील सांगितले आहे.

हे देखील पाहा -

साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत भाविक बाबांच्या दरबारात रुपये-पैसे, सोने -चांदी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. कोरोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान दिले असून ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

Shirdi News
समाज कल्याणमधील अनागोंदी कारभार भोवला; प्रभारी सहाय्यक आयुक्त सचिन मडावी निलंबित

कोविड काळात लॉकडाऊन मुळे शिर्डीचे अर्थचक्र पूर्णतः थांबले होते परंतु कोविड काळानंतर साई मंदीर सुरू झाल्याने देश भरातील साई भक्त शिर्डीत येत असल्याने शिर्डीचे अर्थ चक्र पुन्हा सुरळीत झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com