उघड दार देवा आता! गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची मागणी

उघड दार देवा आता! गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची मागणी
saint gajanan maharaj mandir shegoan

- संजय जाधव

बुलढाणा : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आज (मंगळवार) आषाढी अर्थात देवशयनी एकादशी निमित्त अंतर्गत कार्यक्रम असणार आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे भाविक येत असतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे मंदिर बंदच आहे. आज आषाढी एकादशीला सुद्धा मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. (saint-gajanan-maharaj-mandir-shegoan-devotees-sml80)

राज्यात मनाच्या दहा पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत पण यावर्षी संत गजानन महाराजांच्या पालखीला मनाच्या दहा पालख्यात स्थान न मिळाल्याने भक्तांमध्ये काहीशी नाराजीही दिसत आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर saint gajanan maharaj mandir shegoan परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

saint gajanan maharaj mandir shegoan
Ashadhi Ekadashi 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

तरी भाविक बाहेरच्या जिल्ह्यातून संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी शेगावात दाखल होत आहेत. परंतु मंदिरच बंद असल्याने भाविकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. सिल्लाेड येथील भाविक म्हणाले आता काेराेना कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने मंदिर खूली करावीत.

दरवर्षी या भागात लाखो भाविक दाखल होत असतात. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी केलेल्या उपाययाेजनांमुळे आणि निर्बंधामुळे सर्व काही ठप्प झालेले आहे. येथील छोटे मोठे व्यवसायिकांवर आता उपासमारीचे वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com