दै.सकाळच्या दीक्षा विशेषांकाचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन

धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या पार्श्वभूमीवर या विशेषकांचे प्रकाशन आज अकोला येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले.
दै.सकाळच्या दीक्षा विशेषांकाचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
दै.सकाळच्या दीक्षा विशेषांकाचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशनजयेश गावंडे

अकोला : परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात लाखो लोंकासह दीक्षा घेत सामाजिक क्रांतीचा एक नवा इतिहास घडविला. जो शोषित, पीडित समाज अंधकारात जीवन जगतो, त्या असंख्य समाजसमुहांना उजेडात आणण्याचे महान कार्य या धम्मदीक्षा सोहळ्यामुळे झाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो समतेचा विचार या दीक्षा भूमीवर दिला तो सामान्यातील सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘सकाळ’ माध्यम समुहाच्या माध्यमातून दीक्षा विशेषकांच्या माध्यमातून होत आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या पार्श्वभूमीवर या विशेषकांचे प्रकाशन आज अकोला येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले.

हे देखील पहा :

धम्मचक्र प्रवर्तनदिना निमित्त ‘सकाळ’ माध्यम समुहाच्या वतीने केले १६ वर्षांपासून ‘दीक्षा’ विशेषांक प्रकाशित केला जात आहे. सकाळ माध्यम समुहाने ही परंपरा कोरोना काळातही जपत ‘दीक्षा’ विशेषांक प्रकाशित करून वाचकांच्या हाती दिला आहे. यावर्षीही सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांच्या मार्गदर्शनात हा विशेषकांत गुरुवारी प्रकाशित करण्यात आला.

दै.सकाळच्या दीक्षा विशेषांकाचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
निशस्त्र पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांना उपनिरीक्षक पदाची संधी!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला येथील यशवंत भवन या निवास स्थानी त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष ॲड. संतोष रहाटे, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, माजी जि.प. सदस्य काशीराम साबळे, राहुल अहिरे यांची उपस्थिती होती. धम्मचक्रप्रवर्तनदिनाच्या निमित्ताने ‘दीक्षा’ विशेषांक प्रकाशित करणारे ‘सकाळ’ हे एकमेव माध्यम समूह आहे. यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व विजयादशमीच्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.