Beed : "भाजप नेत्यांनी जणाची नाही; मनाची तरी लाज बाळगली पाहिजे"

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा भाजपवर घणाघात!
Beed : "भाजप नेत्यांनी जणाची नाही; मनाची तरी लाज बाळगली पाहिजे"
धनंजय मुंडे साम टीव्ही

बीड :- बीडमध्ये समता परिषद आयोजित कृतज्ञता मेळाव्यातून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी मधल्या काळात नाही तेवढे आरोप करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारमधील ओबीचीचे नेते करताय तरी काय? त्यांनी राजीनामे द्यावे इथपर्यंत मागण्या करण्यात आल्या.

हे देखील पहा :

कोणत्या सरकारच्या काळात या आरक्षणाच्या तारखा रद्द झाल्या. अडचणी त्यांनीच निर्माण करायच्या आणि आरक्षण पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये असे त्यांनीच म्हणायचे. ओबीसींसाठी छगन भुजबळ यांनी आवाज उठवला मात्र, भाजपवाले नुसते आरोप करण्यातच मश्गुल असल्याचे मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे
Dhule : शासकीय रुग्णालयात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांनी केली तोडफोड!

दरम्यान, आमच्या पक्ष्याच्या वतीने आमच्याच ओबीचीच्या नेत्यावर कसे अन्याय करताय असं म्हणणाऱ्यांनी "जणाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे" अशी टीका देखील मुंडे यांनी भाजपच्या नेत्यावर नाव न घेता केली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com