शरद पवारांना दिलेल्या धमकीवरुन समता परिषद आक्रमक, पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत...
शरद पवारांना दिलेल्या धमकीवरुन समता परिषद आक्रमक, पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या
Sharad PawarSaam TV

बीड: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar) सोशल मीडियातून दिलेल्या धमकीवरून, बीडमध्ये समता परिषद आक्रमक झाली आहे. समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांनी, बीडच्या शिवाजीनगर पोलीस (Beed Police) ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलीय. तर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून जाणार नाहीत, असं म्हणत समता सैनिकांनी पोलीस ठाण्यातचं ठिय्या मांडला आहे.

Sharad Pawar
''केतकी चितळेचे वक्तव्य ही विकृती, गृह विभागाने कारवाई करावी''

समता परिषदेच्या वतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सोशल मिडीयावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विषयी जाणीवपूर्वक, निखील भामरे, मनोज बागलाणकर , केतकी चितळे, अॅड. नितीन भावे, या सर्वांनी मिळून बदनामीकारक मजकुर टाकल्यामुळे समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या मनास धक्का बसला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत.

त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देत सोशल मिडीयावर म्हटलंय, की " वेळ आली आहे बारामतीच्या " गांधी " साठी , बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची ..." अशा वाक्यात घाणेरडी पोस्ट टाकुन जिवे मारण्याच्या उद्देशाने ही पोस्ट तयार केलेली आहे. त्यामुळं मनोज बागलाणकर, निखील भामरे , केतकी चितळे व अॅड . नितीन भावे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. असं म्हणत बीडमध्ये समता सैनिक आक्रमक झाले असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठाण्यातून जाणार नाहीत. अस म्हणत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.