Sangli : बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत संभाजी भिडेंनी वाहिली श्रद्धांजली

हिंदुत्वाचे काम करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचा आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचा चांगला स्नेह होता.
Sangli : बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत संभाजी भिडेंनी वाहिली श्रद्धांजली
Sangli : बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत संभाजी भिडेंनी वाहिली श्रद्धांजलीविजय पाटील

सांगली: काल पहाटे पुण्यात (Pune) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच वृद्धापकाळानं निधन झालं. बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांना अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच आज सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (ShivPratishthan Hindusthan) वतीने बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

हे देखील पहा -

हिंदुत्वाचे काम करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचा आणि बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे चांगले सबंध होते. अधून मधून ते एकमेकांना भेटत देखील असायचे. दरम्यान बाबासाहेबांच्या राजाशिवछत्रपती (Rajashivchhatrapati) या ग्रंथाची पारायण देखील शिवप्रतिष्ठान घेते. पुरंदरेंबद्दल असणाऱ्या याच स्नेहापोटी आज बाबासाहेब पुरंदरेंचे अस्तिकलश सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकऱ्यांनी आणि भिडे गुरुजींनी अस्थीकलशाचे अखेरचे दर्शन घेतले. 

Sangli : बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत संभाजी भिडेंनी वाहिली श्रद्धांजली
नागपुरात Cyber Crimeचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश?

दरम्यान आज त्रिपुरा (Tripura) मधील अफवा आणि त्यानंतर झालेला हिसांचार याचा निषेध करण्यात येणार होता मात्र सांगली जिल्ह्यात जमावबंदी आदेश (Curfew order in Sangli district) लागू असल्याने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी यांनी ही निषेध सभा रद्द करत अगदी मोजक्या धारकऱ्यांसोबत घेऊन त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com