शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 'महाराष्ट्र बंद' ला संभाजी ब्रिगेड चा जाहीर पाठिंबा

सर्व तरुणांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलं पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 'महाराष्ट्र बंद' ला संभाजी ब्रिगेड'चा जाहीर पाठिंबा
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 'महाराष्ट्र बंद' ला संभाजी ब्रिगेड'चा जाहीर पाठिंबाSaamTvNews

पुणे : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून सतत वेगवेगळ्या प्रकारचा त्रास सहन करून तो अन्नधान्य पिकवतो, सर्वांना अन्नधान्य पुरवून सर्वांना जगवतो. मात्र राजकीय सूडबुद्धीने याच शेतकऱ्याला गाडीखाली 'चिरडून ठार मारले' जात आहे. एवढी भयानक हिंसक वृत्ती या लोकांमध्ये कशी काय जन्माला आली? या आधी हिटलरने जर्मनीमध्ये ज्यु लोकांना कारखान्याच्या चिमणीत घालून मारले होते. त्याच पद्धतीच्या हुकूमशाही प्रवृत्तीची पुनरावृत्ती आपल्या देशात होत आहे. त्यामुळेच देशातील भाजप सरकारची हिटलर शाही आपण खपवून घ्यायची नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांनी आपला 'दबावगट' निर्माण केला पाहिजे. यासाठी देशभरातील सर्व तरुणांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलं पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील पहा :

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी नरसंहार सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतकरीविरोधी काळे कायदे देशात लागू केल्याने केंद्र सरकारवर देशभरातील शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे. मोदी सरकार हे सर्वसामान्यांचे नसून भांडवलदारांचे (अदानी, अंबानीचे) सरकार असल्यामुळे भांडवलदारांच्या हिताचेच निर्णय केंद्र सरकार घेत आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाहीत. दिल्लीत जवळपास वर्षभर चालत असणाऱ्या आंदोलनाची साधी दखल सुद्धा हे सरकार घेत नाही याचा अर्थ केंद्र सरकारची ही रानटी प्रवृत्ती आहे. या विरोधात उद्या महाराष्ट्र सरकारने पुकारलेल्या बंदला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी संभाजी ब्रिगेड या बंद मध्ये सहभागी होणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी संभाजी ब्रिगेड आजपर्यंत नेहमी संघर्ष करत आलेली आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 'महाराष्ट्र बंद' ला संभाजी ब्रिगेड'चा जाहीर पाठिंबा
Pune : पुण्यातील गुंठेवारीबाबत एकनाथ शिंदेंचे महत्वपूर्ण भाष्य!

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे आणि कामगार कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची सुपारी मोदी सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगार उध्वस्त होणार असून सरकारने या प्रश्नाकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्याच्या संघर्षाचा वणवा पेटत असून केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन उध्वस्त होणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना बळ देण्याचे काम करावे आणि हे काळे कृषी कायदे तात्काळ पाठीमागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या अटकेच्या निषेधार्थ सोमवारच्या 'महाराष्ट्र बंद' ला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com