Samruddhi Mahamarg Accident: भीषण अपघात..एकाच कुटुंबातील ४ भावंडांचा मृत्यू; अंत्‍यविधीवरून परतताना काळाची झडप

भीषण अपघात..एकाच कुटुंबातील चार भावंडांचा मृत्यू; अंत्‍यविधीवरून परतताना काळाची झडप
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg AccidentSaam tv

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी तेलंगाना येथील काकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रम आटोपून सुरतकडे जाणाऱ्या भावंडांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात (Accident) झाला. यात एकाच कुटुंबातील चार भावंडांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले व गाडी (Samruddhi Mahamarg) दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. (Breaking Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; धावत्या ट्रकला ट्रॅव्हल्सची मागून धडक, १२ जण गंभीर जखमी

संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड- शेकटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर आज (२४ मे) पहाटे तीन वाजच्‍या सुमारास अपघात झाला. संजय रजणभाई गौड (वय ४३), कृष्णा राजणभाई गौड (वय ४४), श्रीनिवास रामू गौड (वय ३८), सुरेशभाई गौड (वय ४१ रा. सर्व लेफ सिटी करडवा सुरत गुजरात) असे अपघातात मयत झालेल्या चार चुलत भावंडांचे नाव आहे. गौड कुटुंबीय सुरत येथे व्यवसाय करता. त्यांचा सुरत (Surat) येथे कपड्याचा व्यासासाय आहे. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले

Samruddhi Mahamarg Accident
Dhule Crime News: दिरानं मर्यादा ओलांडली; भावजयीवरअत्याचार करत पेट्रोल टाकून पेटवले; मध्‍यरात्रीच्‍या घटनेने खळबळ

चौघांचा मृत्‍यू, मुलगा बचावला

गौड कुटुंबातील एका व्यक्तीचा तेलंगाना येथे मृत्यू झाला होता. काकांच्या अंत्यविधीसाठी चारही भावंड कारने अंत्यविधीच्या (Sambhaji Nagar) कार्यक्रमासाठी गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सर्व सुरतकडे निघाले होते. दरम्यान करमाड- शेकटा येथील समृद्धी महामार्गावर गौड कुटुंबियांच्या वाहन चालकांचे नियंत्रण सुटले. झोपेची डुलकी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव वेगात असलेली चारचाकी दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. गाडीत मागे बसलेला मुलगा अपघातात बचावला आहे. दरम्यान या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com