‘स्वराज्य’ साठी बोधचिन्ह सूचवा; संभाजीराजेंचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

स्वराज्य पक्षाचं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.
Sambhaji Raje Chhatrapati
Sambhaji Raje ChhatrapatiSaam TV

मुंबई : राज्यसभा निवडणुकीपूर्वी (Rajya Sabha Election) संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत 'स्वराज्य' पक्षाची स्थापना केली. आता स्वराज्य पक्षाचं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. आज संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट करत महाराष्ट्रातील जनतेला 'स्वराज्य' पक्षाला बोधचिन्ह सूचवण्याचं आवाहन केलं आहे. (Sambhaji Raje Chhatrapati Latest Marathi News)

Sambhaji Raje Chhatrapati
विरोधकांनी माझ्यामागे सिल्लोडचा औरंगजेब लावला; रावसाहेब दानवेंचं खळबळजनक विधान

“विस्थापित मावळ्यांना संघटित करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह म्हणजेच लोगो जनतेच्याच संकल्पनेतून साकारावं, अशी आमची इच्छा आहे. ते बोधचिन्ह सुचवा", असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.

‘स्वराज्य’चं बोधचिन्ह सूचवल्यास सन्मान

'हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह 'स्वराज्य'चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल'. असं संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

Sambhaji Raje Chhatrapati
सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकरानं आवळला प्रेयसीचा गळा; सांगलीतील धक्कादायक घटना

‘स्वराज्य’चं बोधचिन्ह कसं असावं?

• बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये.

• बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे.

• एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल.

• एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील.

संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली फेसबुक पोस्ट

‘स्वराज्य’चं बोधचिन्ह कसं सुचवाल?

जर तुम्ही सुद्धा संभाजीराजेंच्या ‘स्वराज्य’ साठी वापरलं जाणार बोधचिन्ह सूचवण्यास उत्सुक असाल तर, तुम्ही तयार केलेलं बोधचिन्ह तुम्ही What's APP करू शकता त्यासाठी संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये एक नंबर दिला आहे. त्यावर तुम्ही तयार केलेलं बोधचिन्ह पाठवता येईल.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com