SambhajiRaje Chhatrapati: 'भावी मुख्यमंत्री'च्या बॅनरवर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

कार्यकर्त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर लावले.
SambhajiRaje Chhatrapati
SambhajiRaje ChhatrapatiSaam tv

तबरेज शेख

Sambhajiraje chhatrapati News In Marathi

आज पंकजा मुंडे, अजित पवार यांच्यानंतर स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांचेही 'भावी मुख्यमंत्री' असे बॅनर झळकले आहेत. नाशिकच्या मुंबई नाका येथील उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर लावले. या बॅनरवर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'नुसतं बोर्डावर लिहिणं आणि होणं, यात फरक आहे असं स्पष्टीकरण या बॅनरवर संभाजीराजे छत्रपतींनी दिलं. (Latest Marathi News)

स्वराज संघटनेचा उत्तर महारष्ट्र विभागीय कार्यालयाचे आज नाशिकमध्ये उद्घाटन झाले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, एका चांगल्या जागी उद्घाटन झालं आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले जाईल. कार्यालय खूप चांगलं झालं आहे. नाशिक माझा आवडता जिल्हा आहे'.

SambhajiRaje Chhatrapati
Nana Patole News: ओबीसी आग, सरकारने आगीत हात घातला तर सरकार जळून जाईल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

'भावी मुख्यमंत्री'च्या बॅनरवरवर भाष्य करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'बोर्डावर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे मी आभारी आहे. बोर्डावर लिहणे आणि होणे ही गोष्ट वेगळी आहे. माझ्या डोळ्यासमोर एकच अजेंडा आहे. स्वराजाच्या माध्यमातून जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचणे आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर कोणीच खूश नाही. राज्य सत्तेसाठी कोणत्याही गोष्टी सुरू आहेत'.

जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी भाष्य करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'मी काल माझी भूमिका सविस्तर मांडली आहे. भावना आणि न्यायिक या दोन्हींचे समेट कसे करता येईल हे महत्वाचे आहे. त्यांनी त्यांची तब्येत सांभाळावी, त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल याबाबत चर्चा करावी'.

SambhajiRaje Chhatrapati
Mega Block on Sunday Mumbai: मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक; कधी आणि कुठे अन् कसा? वाचा सविस्तर

'माझ्या दृष्टीकोनातून प्रश्न सोडवत असताना जीव देखील महत्वाचे आहे. 49 मराठा समजाच्या लोकांनी आत्महत्या केली आहे. समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे, ते विचार करून निर्णय घेतील. सरकारने देखील आरक्षण देताना टिकणारे आरक्षण द्यावे', असे ते पुढे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com