MarathaReservation : ..अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करू !
sambhajiraje chhatrapati

MarathaReservation : ..अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करू !

काेल्हापूर : मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने १७ जूनला बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. परंतु एक महिना पूर्ण होऊन देखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती sambhajiraje chhatrapati पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपसमितीच्या सदस्य मंत्रीगणांस पत्र लिहून इशारा दिला आहे. sambhajiraje-chhatrapati-writes-letter-maharashtra-cm-uddhav-thackreay-on-maratha-reservation

राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असल्या तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप काेणतीही ठाेस कार्यवाही झालेली नाही अशी खंत राजेंनी पत्रात व्यक्त केली आहे.

मंत्रीगण यांनी या सर्व परिस्थितीचा विचार करुन संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलजबावणी करावी अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरु करु असा इशारा पत्रात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सरकाराला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com